PCMC : अखेर 14 दिवसानंतर अतिरिक्त आयुक्त खोराटे यांना रुजू करून घेतले

एमपीसी न्यूज  – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त-2 पदाचा सुरू असलेला (PCMC) प्रशासकीय आणि राजकीय तिढा अखेर 14 दिवसांनी संपुष्टात आला आहे. नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी गुरूवारी  पलिका सेवेत रुजू करून घेतले आहे. त्यामुळे 14 दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विविध विभागाच्या कामकाजाला आता गती येईल.

Today’s Horoscope 21 July 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची (दि.6) जुलैला बदली झाली. त्यांच्या जागी सोलापूर महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांची नियुक्ती करण्यात आली.

खोराटे हे दुसऱ्याच दिवशी म्हणजे (दि.7) जुलैला पालिकेत रुजू झाले. मात्र, त्यांच्याकडे अद्याप अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार देण्यात आलेला नव्हता.

तसेच वाघ यांची बदली झाली असली तरी खोराटे यांच्याकडे पदभार देऊ नये, असे एका नव्याने शपथ घेतलेल्या मंत्र्याने थेट आयुक्त सिंह यांना फोन करून तोंडी आदेश दिला होता.

त्यामुळे सिंह यांनी लेखी आदेशापेक्षा तोंडी आदेशाला महत्व देऊन खोराटे यांच्याकडे पदभार दिला नव्हता.

अखेरीस गुरूवारी अतिरिक्त आयुक्त खोराटे यांना पालिका सेवेत रुजू करून घेण्यात आले आहे. त्यांनी प्रशासकीय कामकाजही सुरू केले (PCMC)  आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.