Talegaon : दिव्यांच्या झगमगाटात कलापिनीचे मांगल्याचे आणि संस्काराचे दिप पूजन संपन्न

एमपीसी न्यूज – कलापिनी बाल भवन मध्ये यावर्षीही दरवर्षीप्रमाणे उत्साहात (Talegaon) दीपपूजन झालं. कलापिनी बालभवन स्वास्थ्य योग आणि महिला मंच यांचा एकत्रित दीपपूजनाचा कार्यक्रम प्रसन्न वातावरणात साजरा झाला. आजच्या धावपळीच्या काळात मुलांवर संस्कार करण्याचे कार्य कलापिनी नेहमीच करते. सण त्यांचं महत्त्व मुलांना परिचित होणं हाच कलापिनी बालभवन चा प्रयत्न असतो.

PCMC : अखेर 14 दिवसानंतर अतिरिक्त आयुक्त खोराटे यांना रुजू करून घेतले

आकर्षक सजावट करून बालभवन स्वास्थ्य योग, महिला मंच यांचं एकत्रित दीपपूजन झालं.

यावेळी नटराज पूजन डॉ. सौ. अश्विनी परांजपे आणि सौ.मंजुषा अभ्यंकर तसेच वृषाली आपटे,वैशाली लिमये यांच्या हस्ते करण्यात आलं तर अगदी मशाल,दिवटी,पणती, लामणदिवा, गॅस बत्ती,समयीपासून लाईटच्या माळा अशा दिव्यांची ओळख करून देणार गाणं बालभवन च्या मुलांनी सादर केलं.

दिव्यांची आरती झाल्यानंतर महिला मंचच्या सौ. दिपाली जोशी यांनी दिव्याचं महत्त्व सांगणारी कविता सादर केली, तर मेधा रानडे यांनी शुभम करोति कल्याणम हे गीत सादर केलं.

सौ. मीरा कोनूर यांनी छानशी गोष्ट सांगितली. दीप पूजनाचे औचित्य साधून माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मावळ तालुक्यात तिसरी आलेल्या चिन्मयी लिमये हीच कौतुकही यावेळी करण्यात आलं.

त्याचबरोबर महिला मंचाच्या उषा महाजन यांनीही गाणं सादर केलं तर अरुणा कुलकर्णी यांनी तेजो निधी लोहगोल तर महादेवी ढब्बू यांनी कानडीतून दिव्याचं महत्त्व सांगणार गाणं सादर केलं.

अतिशय उत्साहात पार पडलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. राखी भालेराव हिने केलं तर बालभवनच्या प्रशिक्षकांनी ज्योती ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी (Talegaon) केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.