PCMC News : महापालिकेच्या स्पर्धा परिक्षा केंद्रातील चार विद्यार्थी झाले अधिकारी

 एमपीसी न्यूज – महाट्रान्स्को, डीआरडीओ तसेच केंद्रीय रेल्वे विभागाने नुकत्याच घेतलेल्या स्पर्धा परीक्षेत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्पर्धा परिक्षा केंद्रातील (PCMC News) चार विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन करून अधिकारी पद संपादन केले. त्यांचा महापालिकेस सार्थ अभिमान वाटत असल्याचे मत क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे यांनी व्यक्त केले.

महापालिकेच्या छत्रपती संभाजीनगर येथील साई उद्यानातील भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम स्पर्धा परीक्षा केंद्रात यश संपादन  करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास क्षेत्रीय कार्यालयातील विजयश्री देसाई, राजीव मोहन, सुरेखा मोरे, नलिनी मोजे, प्रतिभा मुनावत, रामदास जाधव ,राजेंद्र आंभेरे,सुभास  घुतुकुडे, राजू दाभाडे, प्रवीण चाबुकस्वार,वैशाली थोरात ,कांचन कोपर्डे, वर्षा जाधव  व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

डीआरडीओ संस्थेत सीनियर टेक्निकल असिस्टंट या पदावर नियुक्ती झालेल्या दत्तात्रय शिवाजी ढवळे यांचा,  महाट्रान्सको  मध्ये असिस्टंट इंजिनियर या पदावर नियुक्ती झालेल्या बालाजी कुंडलीक कांबळे, विध्याधर शिंदे, महाराष्ट्र रेल्वे ग्रुप डी या पदावर नियुक्ती झालेल्या विशाल हंडरगुळे यांचा क्षेत्रीय (PCMC News) अधिकारी सुचिता पानसरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .यावेळी जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक,ग्रंथपाल राजू मोहन आदींनी मार्गदर्शन केले.

Alandi News : निवृत्त शिक्षक बबनराव फडके यांचे निधन

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संभाजीनगर येथील उद्यानामध्ये माजी राष्ट्रपती,भारतरत्न  डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम स्पर्धा परीक्षा  केंद्र  सातही दिवस  सकाळी  सात  ते  रात्री दहापर्यंत सुरू असते. 2017 पासून  सुरू असलेल्या या स्पर्धा परीक्षा केंद्रातून अनेक विद्यार्थी यूपीएससी व एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

या  केंद्रात अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात येतात. परीक्षा काळात अनेक वर्तमान पत्र, साप्ताहिके, मासिके विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली असतात. येथे विविध पुस्तकांसह वाय-फाय सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निशामक यंत्रणा, इन्वर्टर (PCMC News) इत्यादी सुविधा या स्पर्धा परीक्षा केंद्रात उपलब्ध करून दिलेले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरेश निघोज व नीलम गाढवे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.