PCMC : पाणी पुरवठ्याच्या तक्रारींसाठी महापालिकेतर्फे नागरिकांसाठी हेल्पलाइन क्रमांक जाहीर

एमपीसी न्यूज – मागील साडेतीन वर्षांपासून ( PCMC ) पिंपरी-चिंचवडकरांना एकदिवसाआड पाणीपुरवठा करणारे महापालिका प्रशासन पवना धरण 97 टक्के भरले. तरी, दिवसाआड पाणीपुरवठा करण्यावर ठाम आहे. पाणीपुरवठ्याबाबत तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक जाहीर केला आहे. सारथी हेल्पलाइन 8888006666 आणि पाणीपुरवठा तक्रार कक्ष (24तास) 7722060999 यावर नागरिकांना तक्रार करता येईल.

गळती, चोरीमुळे पाणीपुरवठा कमी दाबाने, तसेच अपुरा, अनियमित होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने महापालिका प्रशासनाने समन्यायी पद्धतीने पाणी वितरणासाठी 25 नोव्हेंबर 2019 पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. पवना धरणात 97 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे दररोज पाणीपुरवठ्याची नागरिकांची अपेक्षा होती. पण सर्वांना समान आणि मुबलक पाणीपुरवठा होत असल्याचे सांगत प्रशासनाने एक दिवसाआड पाणीपुरवठा कायम ठेवला आहे.

वीजपुरवठा खंडित झाल्याने, पंप नादुरुस्त झाल्याने, जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठ्यात तांत्रिक अडचणी येत होत्या. नागरिकांनी तक्रार कोणाकडे करावी, असा प्रश्न निर्माण होत होता. त्यासाठी हेल्पलाइन सुरू करण्यासह अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली आहे.

पाणीपुरवठा वेळापत्रक महापालिकेच्या pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यावर क्षेत्रीय कार्यालयनिहाय उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांचे संपर्क क्रमांक दिले आहेत. पाणीविषयक तक्रारींबाबत प्रथम त्यांच्याशी संपर्क साधावा. त्यांच्याकडून दखल न घेतली गेल्यास संबंधित प्रभागांच्या कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधावा. आवश्यकता वाटल्यास सहशहर अभियंता किंवा अतिरिक्त आयुक्तांशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Pune : मुंबई पाठोपाठ पुण्यातील ससुन रुग्णालयात ही तृतियपंथ्यासाठी स्वतंत्र वॉर्ड

वीजपुरवठा खंडित झाल्यास, जलवाहिनी, वितरण वाहिनीला गळती लागल्यास पाणीपुरवठा खंडित होतो. पाणी वितरण प्रणालीत व्यत्यय येतो. त्या वेळच्या परिस्थितीनुसार पाणीपुरवठ्याच्या ( PCMC) वेळापत्रकांमध्ये बदल केले जातात. पाणीपुरवठाविषयक तक्रार असल्यास नागरिकांनी 24 तास सेवेतील तक्रार कक्षाशी किंवा सारथी हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.