PCMC : उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप

एमपीसी न्यूज – दिवाळी सुट्टीनंतरच्या (PCMC) पहिल्याच दिवशी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप केले आहे. दोन उपायुक्त आणि एका सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजात फेरबदल केले आहेत.

महापालिकेचे उपायुक्त मनोज लोणकर यांच्याकडील भांडार विभागाचे कामकाज काढून अग्निशमन आणि माहिती व जनसंपर्क विभागाचे कामकाज सोपविण्यात आले आहे. तर, जनसंपर्क आणि उद्यान विभागाचे उपायुक्त रविकिरण घोडके यांच्याकडील जनसंपर्क विभागाचा पदभार काढण्यात आला आहे. त्यांच्याकडे आता केवळ उद्यान विभागाची जबाबदारी असणार आहे.

Talegaon Dabhade : अनाथ, मतिमंद मुलांसोबत रोटरीची दिवाळी साजरी

शिक्षण आणि अग्निशमन या दोन विभागाची जबाबदारी असलेल्या सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांच्याकडील(PCMC) अग्निशमची जबाबदारी कमी केली आहे. त्यांच्याकडे आता केवळ शिक्षण विभाग ठेवण्यात आला आहे. अहमदनगर येथील जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाने यांची पिंपरी महापालिकेत पदोन्नतीने उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. भदाने यांच्याकडे मध्यवर्ती भांडार विभागाचे कामकाज आयुक्त सिंह यांनी सोपविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.