PCMC : एलजीएस अभ्यासक्रम उत्तीर्ण कर्मचा-यांना वेतनवाढ देण्यास टाळाटाळ

एमपीसी न्यूज – एलजीएस अभ्यासक्रम उत्तीर्ण (PCMC)कर्मचा-यांना देण्यात येणा-या आगाऊ वेतनवाढ देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करत चौकशी करण्याची मागणी सेवानिवृत्त कार्यालय अधीक्षक इदनानी कृपालदास यांनी केली.

याबाबत नगरविकास विभाग, महापालिका (PCMC)आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महापालिकेत कार्यालय अधीक्षक पदावर कार्यरत होतो. 31 ऑगस्ट 2023 रोजी सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालो.

महापालिकेतर्फे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थाकडे एलजीएस अभ्यासक्रम सत्र जुलै 2019 करिता 23 महापालिका कर्मचा-यांची निवड करण्यात आली होती. एलजीएस अभ्यासक्रम प्रशिक्षणाकरिता कर्मचा-यांनी केलेला खर्च कोर्स फी, परीक्षा फी, इतर खर्च महापालिकेने प्रतिपूर्ती करुन यापूर्वी दिलेले आहेत.

Moshi : मोशीतील शिवरस्ता रस्त्याचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते भूमिपूजन

फेब्रुवारी 2020 महिन्यात मी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे एलजीएस कोर्स उत्तीर्ण केल्याने नियमानुसार आगाऊ वेतनवाढ मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे. परंतु, आगाऊ वेतनवाढ मिळत नाही. महापालिकेकडून कोणत्याही स्वरुपाचे लेखी उत्तर मिळत नाही. स्थानिक लेखा निधी यांनी एलजीएस, एलएसजीडी उत्तीर्ण कर्मचा-यांना देण्यात येणा-या वेतनवाढी संदर्भात आक्षेप उपस्थित केला आहे.

त्यामुळे आम्हाला आगाऊ वेतनवाढ मिळत नाही, अशी चर्चा आहे. वेतनवाढ बंद करायची होती, तर तसे परिपत्रक काढणे आवश्यक होते. परंतु, तसे करण्यात आले नाही. हे आक्षेप फक्त आमच्यासाठीच आहे का, असा सवालही त्यांनी केला. विशेषबाब म्हणून बॅचमध्ये एलजीएस कोर्स उत्तीर्ण केलेल्या सर्व कर्मचा-यांना आगाऊ वेतनवाढ मंजूर करुन फरक व्याजासहित त्वरित द्यावा. अन्यथा सर्वांसाठी नियम एकच ठेवावा अशी मागणी इदनानी कृपालदास यांनी केली आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.