Vadgaon : केशवनगर मधील प्रलंबित रस्त्याचे काम पूर्ण

एमपीसी न्यूज – वडगाव नगरपंचायतच्या प्रभाग क्रमांक दोन(Vadgaon) मधील केशवनगर येथे रेल्वे गेट ते शितळादेवी मंदिर दरम्यानचा सिमेंट कॉंक्रीट रस्ता पूर्ण झाला आहे.

मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम प्रलंबित होते. रस्ता झाल्याने या भागातील नागरिकांना चांगली मुलभूत सोय उपलब्ध झाली असल्याने नागरिकांनी नगराध्यक्ष मयूर ढोरे, नगरसेवक दिनेश ढोरे यांचे आभार मानले.

Chikhali : महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकास अटक
आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून(Vadgaon) महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान फंडातून मा नगराध्यक्ष मयूर प्रकाश ढोरे यांच्या विशेष प्रयत्नांने तसेच मा नगरसेवक दिनेश गोंविदराव ढोरे यांच्या पाठपुराव्याने वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 2 केशवनगर येथील रेल्वे गेट ते शितळादेवी मंदिर परिसरातील रस्ता क्रॉंक्रिटीकरणचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

खूप वर्षांपूर्वीचा प्रलंबित असलेला रस्त्याचा विषय मार्गी लागल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे, नगरसेवक दिनेश ढोरे यांचे विशेष आभार व्यक्त केले.

या व्यतिरिक्त प्रभाग क्रमांक दोन मधील केशवनगर मध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून मा. नगराध्यक्ष मयूर ढोरे,मा नगरसेवक दिनेश ढोरे यांच्या उपस्थितीत एलईडी स्ट्रीट लाईट्स पोलचे लोकेशन निश्चित करण्यात येत असून या एक ते दिड महिन्याच्या कालावधीत संपूर्ण कातवी गावासह केशवनगर मधील प्रभाग क्रमांक दोनच्या परिसरात एलईडी स्ट्रीट लाईट्स चे पोल बसविण्यात येणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.