Chikhali : महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – महिलेच्या विनयभंग प्रकरणी चिखली पोलिसांनी (Chikhali) एकास अटक केली. ही घटना सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पासून 20 नोव्हेंबर या कालावधीत निघोजे, चिखली, देहू-आळंदी रोड येथे घडली.

मयूर संजय शिंदे (वय 30, रा. देहू-आळंदी रोड, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Dehugaon : देहूच्या उपनगराध्यक्षांसह दोन स्विकृत नगरसेवकांचा राजीनामा मंजूर

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी(Chikhali) मयूर याने फिर्यादी महिलेचा सतत पाठलाग केला. महिलेला व्हाटसअपवरून अश्लील व्हिडीओ व मेसेज पाठवले. अश्लील व्हिडीओ कॉल करून महिलेचा विनयभंग केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.