PCMC : सर्वेक्षणात शहरात आढळले 85 अनधिकृत होर्डिंग,  79 जमीनदोस्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना (PCMC) विभागाच्या वतीने गेल्या आठ दिवसांत न्यायप्रविष्ट (434) सोडून केलेल्या सर्वेक्षणात 85 अनधिकृत होर्डिंग आढळले. त्यापैकी 79 होर्डिंग जमीनदोस्त केले. तर, 6 होर्डिंगवर कारवाई राहिली आहे. याबाबतची माहिती सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली.

PCMC : विनापरवाना रजेवर असलेल्या सहाय्यक आयुक्तांचे आयुक्तांना पत्र, म्हणाले…

किवळे येथे गेल्या आठवड्यात अनधिकृत होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर महापालिका आकाशचिन्ह व परवाना विभागाने अनधिकृत होर्डिंग काढण्याची कारवाई सुरू केली. क्षेत्रीय कार्यालयनिहाय परवाना निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली कारवाई केली जात आहे. त्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलातील जवानांकडून बंदोबस्त ठेवला जात आहे.

न्यायप्रविष्ठ असलेल्या 434 होर्डिंग व्यतिरिक्त इतर अनधिकृत होर्डिंगचे सर्वेक्षण करण्यात आले. 85 अनधिकृत होर्डिंग आढळले आहेत. त्यापैकी 79 होर्डिंग जमीनदोस्त केले. तर, 6 होर्डिंगवर कारवाई (PCMC) राहिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.