Today’s Horoscope 28 April 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 28 April 2023 जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – शुक्रवार.

28.04.2023.

शुभाशुभ विचार- चांगला दिवस.

आज विशेष- दुर्गाष्टमी.                                     

राहू काळ- सकाळी 10.30  ते 12.00.

दिशा शूल- पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – पुष्य 09.53 पर्यंत नंतर आश्लेषा.

चंद्र राशी – कर्क.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- आकाशी )

सामाजिक कार्यकर्ते लोकांच्या आदरास पात्र होतील. आज तुम्ही गरजूंस आवर्जून मदत कराल. इतरांची मने सांभाळाल. आज काही शुभ समाचार येणार आहेत.

वृषभ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

आवक पुरेशी असल्याने मनासारखा खर्च करू शकाल. आज जरा स्पष्टवक्तेपणास आवर घालायला हवा अन्यथा नाती दुरावतील. क्षुल्लक कारणाने आज शेजारी रुसून बसतील.

मिथुन ( शुभ रंग- पांढरा )

आज तुम्ही काहीसे लहरीपणाने वागाल कुणाचेही ऐकून घेण्याची तुमची तयारी नसेल. उतावीळ पणाने घेतलेले काही तुमचे निर्णय चुकीचे ठरतील. आज हातचे सोडून पळत्या मागे धावावेसे वाटेल.

कर्क (शुभ रंग- गुलाबी)

एखादी हरवलेली वस्तू पुन्हा शोधल्यास सापडेल. आज तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. नवी वस्त्र खरेदी कराल घरात थोरामोठ्यांच्या हो ला हो करा आणि वाद मिटवा.

सिंह (शुभ रंग- लाल )

आज तुम्हाला महत्त्वाच्या कामासाठी भटकावे लागेल अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढणार आहे अधिकारी वर्गास विदेश दौरे घडतील हातचे सोडून मृगजळा मागे धावणार आहात.

कन्या ( शुभ रंग- क्रीम )

नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठ तुमच्या कामाने प्रभावित होतील. नव्या व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. कामाच्या व्यापात घरगुती समस्या दुर्लक्षित होणार आहेत.

तूळ ( शुभ रंग- राखाडी)

आज तुम्हाला काही मनाविरुद्ध घटनांनी नैराश्य येईल. कार्यक्षेत्रात नवे उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. वैवाहिक जीवनात काही सौम्य मतभेद संभवतात.

वृश्चिक (शुभ रंग- जांभळा)

आज तुमचा आध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. आज नास्तिकही देवाला एखादा नवस बोलून बघतील. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल, दैवाची साथ राहील.

धनु- (शुभ रंग- केशरी)

व्यवसायातील वाढत्या स्पर्धेने आज नवीन व्यावसायिक त्रस्त असतील. आज अडचणीच्या प्रसंगी पत्नीची खंबीर साथ असणार आहे. आज तुम्ही कुटुंबास पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल.

मकर ( शुभ रंग- मोरपंखी )

धंद्यातील येणी वसूल होतील. गोड बोलून आज तुम्ही आपल्या विरोधकांनाही आपलेसे कराल. जुनी दुखरी मात्र आज अंगावर काढू नका. आज तुम्हाला विश्रांतीही गरजेची आहे.

कुंभ (शुभ रंग – भगवा)

कलाक्षेत्रातील मंडळींना वाढत्या स्पर्धेचा सामना करावा लागेल. ज्येष्ठांना आरोग्याच्या काही तक्रारी त्रस्त करतील. आज संध्याकाळी डॉक्टरांच्या भेटीचा योग दिसतो.

मीन -(शुभ रंग – मरून )

कुटुंबीयांच्या वाढत्या मागण्या पुरवताना नाकी नऊ येतील. मुले अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करून दाखवतील गृहिणी आज पाहुण्यांची उठ बस आनंदाने करतील.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क -9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.