PCMC : विनापरवाना रजेवर असलेल्या सहाय्यक आयुक्तांचे आयुक्तांना पत्र, म्हणाले…

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माझा ( PCMC)  शासकीय प्रतिनियुक्तीचा कालावधी संपला असून मला माझ्या मूळ विभागात काम करण्याची इच्छा आहे. त्यामुळे मला कार्यमुक्त करून शासनाच्या नगरविकास विभागाला सूचित करावे, अशी विनंती आकाश चिन्ह व परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी यांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना लेखी पत्राव्दारे केली आहे.

Dehuroad : जुन्या महामार्गावर खाजगी बसचा अपघात; सर्व प्रवासी थोडक्यात बचावले

प्रतिनियुक्तीने पिंपरी महापालिकेत आलेले उपजिल्हाधिकारी संवर्गातील निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर आणि आकाश चिन्ह व परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी रजा संपली. तरी, महापालिकेत रुजू झाले नव्हते. त्यामुळे आयुक्त सिंह यांनी बुधवारी (दि.26) या दोन्ही सहाय्यक आयुक्तांना 24 तासात महापालिकेत हजर होण्याबाबत नोटीस पाठविली होती. त्यानुसार सहाय्यक आयुक्त खांडेकर गुरूवारी (दि.27) पालिका सेवेत हजर झाले. तर, जोशी यांनी पालिका सेवेत हजर न होता आयुक्तांना एक पत्र दिले आहे.

महापालिकेतील माझा शासकीय प्रतिनियुक्तीचा कालावधी संपला आहे. मला माझ्या मूळ म्हणजे महसूल विभागात काम करण्याची इच्छा असल्याने माझी प्रतिनियुक्ती संपुष्टात आणून मला कार्यमुक्त करावे, अशी विनंती जोशी यांनी केली आहे. यावर आयुक्त सिंह काय निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार ( PCMC) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.