Dehuroad : जुन्या महामार्गावर खाजगी बसचा अपघात; सर्व प्रवासी थोडक्यात बचावले

एमपीसी न्यूज – जुना पुणे मुंबई महामार्गावर देहूरोड येथे एका खाजगी ( Dehuroad ) बसचा अपघात झाला. देहूरोड येथील उड्डाण पुलावर हा अपघात झाला असून सर्व प्रवासी थोडक्यात बचावले. ही घटना गुरुवारी (दि. 27) रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री खाजगी बस पुण्याहून मुंबईच्या दिशेने जुना पुणे मुंबई महामार्गावरून जात होती. देहूरोड येथील उड्डाण पुलावर बस आल्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे बस रस्त्याच्या मध्ये असलेल्या डिव्हायडर वर आढळली.
सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. थोडक्यात मोठी दुर्घटना टळली. बसचा अपघात झाल्यानंतर उड्डाणपुलावर दोन्ही मार्गांवर वाहतूक कोंडी झाली. देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. रात्री उशिरापर्यंत बस क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढण्याचे काम सुरू ( Dehuroad ) होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.