Pune : अनधिकृत होर्डिंग्जवर जिल्हा प्रशासनाची आता करडी नजर

एमपीसी न्यूज : किवळे येथे झालेल्या अपघातानंतर (Pune) अनधिकृत होर्डिंग्जवर जिल्हा प्रशासनाची आता करडी नजर आहे. आगामी मॉन्सूनच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल नव्याने ऑडीट करा असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. 

नव्याने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडीटचा दाखला 15 दिवसांत सादर करणे बंधनकारक राहणार आहे. पिंपरी चिंचवड येथे 17 एप्रिल रोजी होर्डिंग पडून 5 जणांचा मृत्यू झाला होता.

Dehuroad : बोडकेवाडी बंधाऱ्यात बुडून तरुणाचा मृत्यू

पुणे ग्रामीण हद्दीतील स्ट्रक्चरल ऑडीट न केलेली सर्व होर्डिंग अनधिकृत समजून संबंधित होर्डिंगधारकांना नोटीस देऊन तात्काळ काढून टाकण्याची कारवाई करा, असे देखील आदेश देण्यात आले आहेत. धोकादायक, वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या होर्डिंगवर तात्काळ कारवाई करावी, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेश दिले आहेत.

अवकाळी पाऊस व नजीकच्या मान्सूनच्या हंगामात पडणाऱ्या पावसाची (Pune) शक्यता विचारात घेऊन जीवित मालमत्ता हानी व वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आदेश देण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.