PCMC News : नोकर भरती ! 387 जागांसाठी मे महिन्यात ऑनलाइन परीक्षा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (PCMC ) विविध विभागातील ‘ब’ आणि ‘क’ गटातील 15 संवर्गातील रिक्त 387 जागांसाठी 26, 27 आणि 28 मे 2023 रोजी तीन संत्रांमध्ये ऑनलाइन परीक्षा होणार आहे.

राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नोकर भरतीवरील निर्बंध उठविले आहेत. त्यानंतर प्रशासनाने विविध पदांसाठी सरळ सेवेने भरती प्रक्रिया सुरू केली. महापालिका सेवेतून दरमहा नियत वयोमानानुसार 20 ते 25 अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. काही कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत. त्यामुळे महापालिकेत सुमारे पाच हजारहून अधिक जागा रिक्त आहेत.

Today’s Horoscope 28 April 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

या रिक्त जागांचा अनुशेष भरून काढण्यासाठी महापालिकेने सरळ सेवेने  भरती करण्याकरिता ‘ब’ आणि ‘क’ गटातील 387  जागांसाठी 13 ऑगस्ट 2022 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. यामध्ये लिपिक-213, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)- 75, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक-41, कनिष्ठ अभियंता (विद्युत)-18, आरोग्य निरीक्षक-13, अतिरिक्त कायदा सल्लागार-1, विधी अधिकारी-1, उपमुख्य अग्शिमन अधिकारी-1,

विभागीय अग्निशमन अधिकारी – 1, उद्यान अधिक्षक (वृक्ष) – 1, सहाय्यक उद्यान अधिक्षक -2, उद्यान निरीक्षक-4, हॉट्रीकल्चर सुपरवायझर-8, कोर्ट लिपिक – 2, अॅनिमल किपर -2 आणि समाजसेवकाच्या 3 अशा 387 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविले होते. ऑनलाईन प्राप्त झालेल्या 1 लाख 30 हजार 470 अर्जांपैकी  छाननीत 85 हजार 771 उमेदवारांचे अर्ज पात्र झाले आहेत. त्यामुळे 386 जागांसाठी 85 हजार 771 परीक्षार्थी असणार आहेत.

जाहिरातीमध्ये प्रसिद्ध केलेल्या पदांचे आरक्षण हे मागासवर्ग कक्षाकडून तपासून घेण्यात आले. जाहिरातीमधील पदांचे रोस्टर तपासणीअंती काही पदांच्या रिक्त जागा तसेच आरक्षणामध्ये बदल झालेला आहे. अंतिम आरक्षणाप्रमाणे 15 संवर्गातील 387 रिक्त जागांची ऑनलाईन परीक्षा 26, 27 आणि 28 मे 2023 रोजी तीन संत्रांमध्ये होणार आहे. या भरतीमध्ये विविध पदे, त्यांचे रोस्टर तपासणीअंती अंतीम झालेले आरक्षण, जाहिरातीमधील पदांसाठी विहीत केलाला अभ्यासक्रम तसेच ऑनसाईन परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशपत्र याबाबत माहिती महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली (PCMC ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.