PCMC : राज्य शासनाच्या ‘त्या’ पत्राकडे पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळेच किवळेतील घटना….

माहिती अधिकार कार्यकर्ते विजय पाटील यांचा दावा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व जाहिरात बोर्डाचे ऑडिट आणि (PCMC) दरवर्षी स्ट्रक्चर ऑडिट करण्याबाबत राज्य लेखा स्थानिक परिक्षण समितीने महापालिकेला ज्ञापन पत्राद्वारे कळविले होते. पण, महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा दावा नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ते विजय पाटील यांनी केला. या पत्राकडे दुर्लक्ष केले नसते तर किवळेतील दुर्दैवी घटना घडली नसती. आकाश चिन्ह व परवाना विभागावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा, असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

Maharashtra : गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा होणार

 

पाटील म्हणाले,  शहरातील जाहिरात बोर्ड भाडे वसुली मध्ये अनियमितता आढळली होती. त्या वेळेसच्या ऑडिट रिपोर्टची प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे शहरातील जाहिरात बोर्डचे प्रामाणिक परीक्षण केले गेले नाही. थकीत कर आकडेवारी प्राप्त झाली नाही, म्हणजेच जाहिरात फलक मोजणी व भाडे आकारणी केली गेली नाही. राज्य शासनाच्या 6 डिसेंबर 2017 च्या ज्ञापन पत्राची दखल घेतली असती. त्यानुसार शहरातील सर्व जाहिरात बोर्डाचे ऑडिट केले गेले असते. तर स्ट्रक्चर ऑडिट सुरू झाले असते. भाडे वसुलीमध्ये वाढ झाली असती.अहवालातील या महत्वपूर्ण पत्राची दखल न घेणे पालिकेचा निष्काळजीपणा दर्शवते.

.3

महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने 2017 मध्ये लेखा विभागाच्या अहवालाचे अवलोकन करून जाहिरात भाडे धोरण व स्ट्रक्चर ऑडिट धोरण व्यवस्थित ठरवले असते. तर शहरात अनधिकृत बोर्ड उभे राहिले नसते.  अशा पद्धतीच्या होर्डिंगला आळा बसला असता. दुर्दैवी घटना रोखता आली असती. त्यामुळे किवळेतील दुर्घटनेतील 5 जणांच्या मृत्यूला व जखमी 3 जणांच्या दुर्घटनेला आकाशचिन्ह विभाग कारणीभूत (PCMC)आहे. विभागातील अधिका-यांवर सरळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पाटील यांनी केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.