Pimpri: पालिकेची सहा महिन्यांत 135 अनधिकृत फलकांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या सौंदर्याला बाधा पोहचविणा-या 135 अनधिकृत फलकांवर आकाशचिन्ह परवाना विभागाने गेल्या सहा महिन्यात धडक कारवाई केली आहे. हे फलक तोडून जप्त करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती आकाशचिन्ह व परवाना विभागाचे सहायक आयुक्त विजय खोराटे यांनी दिली.

शहरातील खासगी इमारती, जागा, गच्ची तसेच, सरकारी व सार्वजनिक जागेवर असे अनधिकृत जाहिरात होर्डिग्ज उभे आहेत. वर्दळीचे चौक आणि रस्त्यावर तर या होर्डिग्जची संख्या सर्वांधिक आहे. जून महिन्यात झालेल्या वादळी वार्‍यासह पावसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी लोखंडी होर्डिग्ज पडून दोन नागरिकांचा हकनाक बळी गेला होता. त्यामुळे अनधिकृत होर्डिग्जचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला होता. दरम्यान, स्थायी समितीने दिलेल्या सक्त सूचनामुळे आकाशचिन्ह विभागाने जानेवारीपासून शहरातील अनधिकृत जाहिरात होर्डिग्जवर कारवाई सुरू केली.

आतापर्यंत एकूण 135 अनधिकृत होर्डिग्जवर कारवाई करून लोखंडी सांगडे जप्त करण्यात आले आहेत. तसेच, अनेकांना नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. तसेच, काही जणांवर गुन्हेही दाखल केले आहेत. ही कारवाई या पुढेही सुरूच राहणार आहे. अनधिकृत होर्डिग्ज धारकांनी पालिकेकडे अर्ज करून रिसतर होर्डिग्जची मान्यता घ्यावी. अन्यथा अनधिकृत होर्डिग्ज तोडले जातील. तसेच, पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करण्यात येतील, असे सहायक आयुक्त विजय खोराटे यांनी सांगितले. ही कारवाई पालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयाकडून केली जात आहे.

"madigeri

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.