Pune : दोन दिवसात डेंग्यूचे 22 रुग्ण

एमपीसी न्यूज – पुणे शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असून गेल्या दोन दिवसात 22 रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. बुधवारी (दि. 4) एकाच दिवसात 10 संशयीत रुग्ण सापडले असून मंगळवारी 11 रुग्ण आढळले होते. जूनमध्ये तब्बल 181 संशयित रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे महापालिका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

पावसाळा सुरू झाल्यापासून डेंग्यू रुग्णांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. शहरात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले असून परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या डासांच्या पैदाशीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच शक्यतो घरी आणि परिसरात पाणी साचू देऊ नये, त्याचबरोबर स्वछता राखण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

"madigeri

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.