Pune : पालखी सोहळ्यासाठी महापालिका सज्ज

एमपीसी न्यूज – संत ज्ञानेश्वर व जगद्गुरू तुकाराम महाराज्यांच्या पालखीचे आगमन शनिवारी (7जुलै) पुण्यनगरीत होणार आहे. यामुळे महापालिकेने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली असून महापालिकेची तयारी पूर्ण झाली आहे. महापौर मुक्त टिळक याच्या हस्ते पालखीचे स्वागत होणार आहे. 
 

पालिकेच्या वतीने या दरम्यान 24 तास पाणीपुरवठा, अग्निशमन, आरोग्य विभाग यांची पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, राडारोडा तसेच बंद पडलेली वाहने वाहतूक विभागाकडून उचलण्यात अली आहेत. पालखी सोहळ्या दरम्यान कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी पालिकेच्या वतीने घेण्यात आली आहे. पालख्यांचा मुक्काम असणाऱ्या ठिकाणची तयारी पूर्ण झाली असून स्वछता करण्यात आली आहे. वारकऱ्यांची निवारा, पाणी, स्वछतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानिक नगरसेवकांकडूनही वारकऱ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 
 
पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये शनिवारी 1 च्या सुमारास दोन्ही पालख्यांचे आगमन झाल्यानंतर पालिकेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात येईल. या पालखी सोहळ्यात डॉक्टरांचे एक पथक असणार आहे. त्याचप्रमाणे पालिका कर्मचाऱ्यांची दिंडी देखील दरवर्षीप्रमाणे सहभागी होणार आहे. शनिवार (7जुलै) आणि रविवारी (8 जुलै) पालख्यांचे मुक्काम असेल त्यानंतर त्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.