Kanhe : लायन दीपक शहा किनारा वृद्धाश्रमाची नवी सुसज्ज इमारत तयार

रविवारी उद्घाटन सोहळ्याचे आयोजन 

एमपीसी न्यूज – लायन दीपक शहा किनारा वृद्धाश्रमाची नवी सुसज्ज इमारत तयार झाली आहे. या इमारतीचा उदघाटन सोहळा रविवारी (दि. 8) मावळ तालुक्यातील अहिरवडे (कान्हे) येथे होणार आहे. 

लायन्स क्लब ऑफ तळेगाव लायन्स आंतरराष्ट्रीय संघटना आणि किनारा वृद्ध व मतिमंद सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने लायन दीपक शहा किनारा वृद्धाश्रम भवन या नवीन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी दहा वाजता माजी आंतरराष्ट्रीय संचालक प्रेमचंद बाफना यांच्या हस्ते इमारतीचा उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मावळ तालुक्याचे आमदार बाळा भेगडे, माजी आमदार कृष्णराव भेगडे उपस्थित राहणार आहेत. 

तसेच कार्यक्रमासाठी रमेशभाई शहा, जयकुमार चोरडिया, अयाज शेख, दीपक नाथानी, राकेश जैन, वेस रिफेल, शिरीष दवणे, शशिकला शहा, विनोदकुमार शहा आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन लायन्स क्लब ऑफ तळेगाव आणि किनारा वृद्ध व मतिमंद सेवा ट्रस्ट यांच्याकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.