PCMC : उठा…उठा…मार्च एंडिंग जवळ आली, कर भरण्याची मुदत संपत आली’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने मालमत्ता कर (PCMC) भरण्यासाठी थकबाकीदारांना प्रवृत्त करण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात आला असून, या अभियानामध्ये सर्जनशील कल्पनांचा वापर करून नागरिकांपर्यंत मालमत्ता कर भरण्यासाठी आवाहन करण्यात आले. यामध्ये शोले, दुनियादारी, सैराट आदी चित्रपटांच्या बहुचर्चित संवादातून थकीत मालमत्ता कर भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उठा…उठा…मार्च एंडिंग जवळ आली, कर भरण्याची मुदत संपत आली’ असे मीम्स आले आहेत.

‘मराठी मीम मॉंक्स’ या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून नागरिकांनी विभागाने आयोजित केलेल्या मीम स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. स्पर्धेचा पहिला टप्पा संपला असून, येत्या 21 फेब्रुवारीपासून स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. सर्जनशील कल्पना, चित्रपट, विनोद, व्यंगातून सामाजिक प्रश्नांवर बोट ठेवणाऱ्या माध्यमाचे स्थान ओळखून महानगरपालिकेकडून सर्जनशील उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Pune : आरोग्य विभागाच्या महाआरोग्य फिल्म फेस्टिवलचे विजेते घोषित

यामध्ये शोले, दुनियादारी, सैराट आदी चित्रपटांच्या बहुचर्चित संवादातून थकीत (PCMC) मालमत्ता कर भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जसे की, शोले चित्रपटातील, आज माझ्याकडे 3 फ्लॅट, 2 बंगले, 2 दुकाने आहेत. तुझ्याकडे काय आहे? या प्रश्नाला अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नाला दिलेले उत्तर, माझ्याकडे ‘प्रॉपर्टी टॅक्स’ भरल्याची पावती आहे.

किंवा ‘उठा…उठा…सकाळ झाली, मालमत्ता कर भरण्याची वेळ झाली’ अशा नागरिकांमध्ये पोहोचलेल्या संवादातून मिम्सद्वारे मांडणी करण्यात आली आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर सध्या शासकीय आवाहनांसाठी होत असल्याने नागरिकांना त्याचा फायदा होताना व त्यांचे प्रबोधन होताना दिसत आहे.

तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर संवादाच्या परिभाषा पण बदलत राहतात. मिम ही या काळाची नवी परिभाषा आहे. जे एखाद्या लेखातून साध्य होऊ शकणार नाही ते कदाचित एखादे मिम करू शकते. लोकांच्या अवधानाचा परीघ संकुचित होत असताना संवादाच्या नव्या नव्या माध्यमांकडे वळणे क्रमप्राप्त आहे.

मिम स्पर्धा हा त्याचाच एक भाग आहे. यातून थकबाकीदार यांचा निव्वळ उपहास अभिप्रेत नाही तर त्यातून पालिकेच्या एकूण कर प्रणालीबाबत जागृती होणे हा व्यापक उद्देश्य आहे, असे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.