Pimple Nilakh : दोन पिस्टल व चार जिवंत काडतुसासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – पिस्तुल बाळगल्या प्रकरणी (Pimple Nilakh) सांगवी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 2) मध्यरात्री रक्षक चौक ते पिंपळे निलख या मार्गावर करण्यात आली.

राम परशुराम पाटील (वय 29, रा. थेरगाव. मूळ रा. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार विवेक गायकवाड यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : जयंत पाटील यांना मुंबईतील बैठकीपासून दूर सारले का? जयंत पाटील म्हणाले..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्षक चौक ते पिंपळे निलख या रस्त्यावर एकजण संशयितपणे थांबला असून त्याच्याकडे शस्त्र असल्याची माहिती सांगवी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन राम पाटील याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे (Pimple Nilakh) दोन पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे असा 84 हजारांचा ऐवज आढळून आला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.