Pune : जयंत पाटील यांना मुंबईतील बैठकीपासून दूर सारले का? जयंत पाटील म्हणाले..

एमपीसी न्यूज : मुंबईत राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या (Pune) बैठकीबाबत मला कोणत्याही प्रकारची कल्पना देण्यात आली नाही. तसेच माझी साखर आयुक्तांसोबत पूर्वनियोजित बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे मी पुण्यात आलो असून येथील बैठक होताच पुन्हा मुंबईला जाणार आहे. अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडली.

प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुंबईत ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमा दरम्यान जाहीर केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. या सर्व राजकीय घडामोडी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांची मुंबईत बैठक सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

पण, जयंत पाटील अचानकपणे पुण्यात आल्याने त्यांना बैठकीपासून दूर ठेवले का? या बैठकी बाबत जयंत पाटील यांना माहिती दिली नाही का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच (Pune) त्यावर त्यांनी भूमिका मांडली. त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडीबाबत देखील भूमिका मांडली.

Pimpri : टाटा मोटर्सचे मोहन गायकवाड यांना कामगार भूषण पुरस्कार जाहीर

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्याने सर्व कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. त्याबाबत राज्यभरातील आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माझ्याकडे फोनवरून नाराजी व्यक्त केली आहे. पवार साहेबांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, अशी सर्वांचीच मागणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.