Pimple-Saudagar : रेनबो प्लाझा इमारतीमध्ये ओव्हरहेड टॅंक मध्ये पाणी नसल्याने आग विझवताना करावा लागला अडचणींचा सामना

एमपीसी न्यूज :  रेनबो प्लाझा इमारतीमध्ये ओव्हरहेड टॅंक मध्ये पाणी नसल्याने व बघ्यांच्या गर्दीमुळे अग्निशमन कर्मचाऱ्यांना काल लागलेल्या आगी दरम्यान आग विझवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.अशी माहिती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे उप अधिकारी प्रताप चव्हाण यांनी दिली आहे.

शिवार चौकातील नाशिक फाटा-वाकड बीआरटी रोडच्या कडेला असणाऱ्या रेनबो प्लाझा या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील एका दुकानाला काल गुरुवार 8 डिसेंबर रोजी संध्याकाळी 4.30 वा च्या सुमारास अचानक आग लागली होती.

या इमारती समोर तंबू खाली छोटी व्यवसायिकांची दुकाने आहेत. आग लागल्यानंतर या दुकानांच्या मालकांची दुकानातील साहित्य बाहेर काढण्याची धावपळ चालू होती. त्यावेळेस पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विभागाचे अग्निशमन विभागाचे अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले होते.

चव्हाण म्हणाले की, तेथील इमारतीच्या ओव्हरहेड टॅंक मध्ये पाणी नव्हते. घटनास्थळी 6 ते 7 अग्निशमन बंब पोहोचले होते. तसेच तेथे 60 अग्निशमन कर्मचारी होते. इलेक्ट्रिक डक्ट मधील वयरिंगला शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली होती. वयरिंग प्लॅस्टिक व रबरचे असल्याने ते जळाल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता. तो त्या डक्ट मधून सर्व मजल्यांवर पसरला. त्यामुळे आग मोठी असल्याचे वाटत होते.

Pimpri News :  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पिंपरी-चिंचवड शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : सतीश काळे

ओव्हरहेड टॅंक मध्ये पाणी नव्हते व त्याचा वॅाल बंद होता. अंडरग्राऊंड टॅंक मध्ये पाणी होते. त्याचे पंप हाउस बेसमेंट मध्ये होते पण तेथे खूप धूर असल्याने त्याठिकाणी जाणे शक्य नव्हते. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी 2 अग्निशमन बंबाचे पाणी वापरून आग विजवली. बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने अग्निशमन कर्मचाऱ्यांना सूचना देताना अडथळा होत होता.

ब्रेन्टो गाडीच्या 45 मीटर लांब शिडीच्या मदतीने 5 ते 6 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. अग्निशमन कर्मचारी जिन्याने इमारतीत गेले व लोकांना बाहेर येण्यासाठी आवाहन केले. काही नागरिकांनी धूर जास्त येत असल्याने स्वतःला कोंडून घेतले होते. बंद दरवाजाच्या बाहेरून कर्मचारी त्यांना बाहेर येण्यास सांगत होते पण काहीच प्रतिसाद येत नसल्याने 1 ते 2 दरवाजे तोडून लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी एकूण 18 ते 19 जणांना सुखरूप बाहेर काढले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.