Pimpri : आणखी दोन सराईत तडीपार; तडीपारीची कारवाई सुरूच

एमपीसी न्यूज – पिंपरी पोलीस ठाण्यातील आणखी दोन सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी काढले. परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्तांनी एकाच दिवशी सात सराईत आरोपींना तडीपार केले आहे.

गणेश राजू चोरघे (वय 29, रा. पाईट, चोरघेवाडी, ता. खेड), सोमनाथ नथू शिनगारे (वय 26, रा. पाईट, चोरघेवाडी, ता. खेड) अशी तडीपार केलेल्या आरोपींची नावे आहेत.

सराईत आरोपी गणेश चोरघे याच्यावर जबरी चोरी, दुखापत, गर्दी, मारामारी, धमकी यांसारखे गुन्हे दाखल आहेत. यामुळे त्याला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे शहर आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

सराईत गुन्हेगार सोमनाथ शिनगारे याच्यावर दुखापत, गर्दी, मारामारी, धमकी, विनयभंग यांसारखे गुन्हे दाखल आहेत. यामुळे त्याला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे शहर आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.