Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडच्या सायकलपटूचा झेंडा अटके पार

'पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस 2023' जागतिक दर्जेच्या खडतर सायकल स्पर्धेत सुरज मुंढेचे प्रथम प्रयत्नात यश.

एमपीसी न्यूज : अतिशय कठीण अशी (Pimpri Chinchwad) समजली जाणाऱ्या ‘पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस 2023’ या स्पर्धेत पिंपरी चिंचवडमधून सुरज मुंढे याने बाजी मारली आहे. सायकलपटूंसाठी ही स्पर्धा अतिशय खडतर तसेच कठीण मानली जाते. या स्पर्धेत भारतातून यावर्षी सुमारे 290 सायकलपटूंनी आपला सहभाग नोंदविला होता. यातच पिंपरी चिंचवडमधून सुरज मुंढे यांनी पूर्व पात्रता व पात्रता फेरीमध्ये स्वतःला सिद्ध करत ‘पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस 2023’ स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले होते.

पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस 2023 स्पर्धेविषयी –

ऑडॅक्स क्लब पॅरिसियन, फ्रान्स’ तर्फे ‘पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस 2023’ अशी 1200 किमीची जागतिक दर्जेची खडतर सायकल स्पर्धेसाठी प्रत्येक 4 वर्षाला आयोजित केली जाते. या स्पर्धेमध्ये जगभरातून सुमारे 8000 स्पर्धक भाग घेतात. ‘पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस 2023’ 1200 किमीची ही स्पर्धा प्रामुख्याने 80, 84 व 90 तासांमध्ये विभागलेली असते.

‘पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस 2023’ स्पर्धेत सायकलपटूंना पात्र होण्यासाठी एक वर्षा आधीपासून भारतात 1200, 1000, 600, 400, 300, व 200 किमीच्या विविध स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करणे गरजेचे असते. तसेच या विविध स्पर्धा व्यतिरिक्त ऊन, वारा, पाऊस, अति उष्ण, अति थंड  व चढ-उतार अशा विविध आव्हानांना सामोरे जात, आहार व झोपेवर नियंत्रण ठेवत स्वतःला सिद्ध करण्यासाठी सतत सराव करणे आवश्यक असते.


सुरजने 1219 किमीची ही स्पर्धा 90 तास 03 मिनिटे व 50 सेकंदात प्रथम प्रयत्नात यशस्वी रित्या पूर्ण केली. स्पर्धेदरम्यान डोंगर, दऱ्या, घाटा, सतत कठीण चढ-उतार, विषम हवामान, थंडी, ऊन, वारा, पाऊस, आहार व झोपेवर नियंत्रण इत्यादी विविध आव्हानांना सामोरे जात सुरजने ही स्पर्धा प्रथम प्रयत्नातच यशस्वी रित्या पूर्ण करून सायकलिंग क्षेत्रात एक इतिहासच रचला व आपले अंतरराष्ट्रीय सायकलपटू होण्याचे (Pimpri Chinchwad) स्वप्न पूर्ण केले.

Maratha Reservation : जरांगे यांनी सोडले पाणी; ओबीसी गटाचा मागणीला विरोध; सरकार सापडले अडचणीत, तातडीने घेणार सर्वपक्षीय बैठक

सुरजने आपल्या यशाचे श्रेय त्याचे गुरु आशीष जोशी ज्यांनी त्याला निस्वार्थपणे प्रशिक्षण, मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. तसेच त्याची पत्नी स्वाती, मुलगा स्वराज व रजत ज्यांनी त्याला क्षणोक्षणी उत्स्फूर्तपणे फिनिश लाईनपर्यंत विविध रूपाने मदत केली तसेच सायकलिंग क्षेत्रातील त्याला मदत केलेल्या मित्रांनाही त्याने आपल्या विजयाचे श्रेय दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.