Maval MNS : मावळ लोकसभा मतदारसंघ जिंकायचाच या निर्धाराने कामाला लागा – रणजित शिरोळे

एमपीसी न्यूज – मावळ (Maval MNS) लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आपल्याला लढायची आहे. हा मतदारसंघ जिंकायचाच या निर्धाराने सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. पक्षातील हेवेदावे सर्व सोडावेत. मावळ लोकसभेतील नागरिकांच्या घरोघरी पोहचा, लोकांच्या अडी-अडचणी सोडवा, असे आदेश मनसेचे मावळ लोकसभेचे संघटक रणजित शिरोळे यांनी मनसैनिकांना दिले आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघाची नियोजन बैठक रविवारी पार पडली. समन्वय संघटक अमय खोपकर, निरीक्षक सचिन चिखले यांच्यासह पिंपरी विधानसभा, चिंचवड विधानसभा, मावळ विधानसभा, पनवेल विधानसभा, उरण विधानसभा या सर्व विधानसभेतील प्रमुख पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष , शहरप्रमुख, उपशहर अध्यक्ष, विभाग अध्यक्ष, व विविध संघटनेच्या शहराध्यक्ष उपशहर अध्यक्ष उपस्थित होते.

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडच्या सायकलपटूचा झेंडा अटके पार

विधानसभेची बांधणी , कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या, पक्ष संघटना, भविष्यात होणारे मेळावे, त्याचप्रमाणे पदाधिकारी यांच्या अडीअडचणी याविषयी रणजित शिरोळे, अमेय खोपकर यांनी मार्गदर्शन केले. मावळ लोकसभेतील नागरिकांच्या घरोघरी पोहचा, लोकांच्या अडी-अडचणी सोडवा.

त्या दृष्टिकोनातून आदेश देण्यात (Maval MNS) आले. पक्षातील हेवेदावे सर्व सोडा व मावळ लोकसभा जिंकण्याच्या दृष्टिकोनातून कामाला लागा असे खोपकर यांनी सांगितले. मावळ लोकसभेतील सर्व प्रमुख सामाजिक संघटना, प्रमुख मंडळे, प्रतिष्ठीत व्यक्ती यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भेटीगाठी वाढवाव्यात. मावळ लोकसभेत एक नवा इतिहास घडवा असे, आवाहन शिरोळे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.