Pimpri News: सेंद्रीय पद्धतीने जिरवला जातोय कचरा

एमपीसी न्यूज : घरोघरी निर्माण होणा-या ओल्या कच-याचे आहे, त्याच ठिकाणी सेंद्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पिंपरी – चिंचवड शहरातील गृहसंस्थांनी पुढाकार घेतला आहे.(Pimpri news) शहरातील तब्बल 168 हौसिंग सोसायट्यांमार्फत ओल्या कच-यावर सोसायटीच्या आवारातच प्रक्रीया करून तो जिरवला जात आहे. त्यामुळे संकलीत होणा-या कच-याच्या प्रमाणात घट होण्यास मदत होत आहे.  

पिंपरी – चिंचवड शहरात भुमिभरणासाठी जागेची कमतरता असल्याने योग्य माध्यमाद्वारे जैव विघटनशील कच-याचे विघटन केले जाते. यातून मातीसाठी चांगल्या दर्जाचे पोषण मिळते. तसेच समृद्ध आणि पर्यावरणीय अनुकूल खत तयार केले जाते. त्यामुळे मातीची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता वाढते. देशातील बहूतांश महापालिका हद्दीतील घनकच-यामध्ये 35 ते 40 टक्के सेंद्रीय घटक आहेत. या कच-याचे विल्हेवाटीच्या सर्वात जुन्या पद्धतीपैकी एक असलेल्या सेंद्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. सेंद्रीय कच-याच्या विघटनातून नैसर्गिक प्रक्रीयेद्वारे खत किंवा कंपोस्ट याचे उत्पादन होते. यामध्ये पोषक द्रव्ये अतिशय समृद्ध असतात.

Garbage issue : कचरा समस्येविरोधात मेदनकरवाडी ग्रामपंचायत आक्रमक

महापालिकेमार्फत नागरिकांमध्ये कंपोस्टींग बाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. नागरिकांना मोठ्या गृहसंकुलाद्वारे त्यांच्याच आवारामध्ये ओल्या कच-याची कंपोस्टींगच्या माध्यमातून विल्हेवाट लावण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे.(Pimpri news) महापालिकेच्या प्रयत्नांना नागरिक देखील सकारात्मक प्रतिसाद देत असून शहरातील अनेक इमारती-संकुलामध्ये त्यांच्या आवारातच घनकचरा जिरवला जात आहे.

महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागामार्फत सन 2021-22 मध्ये सुमारे 168 हौसिंग सोसायट्यांना त्यांच्या आवारातच घनकचरा विल्हेवाट प्रकल्पासाठी परवानगी देण्यात आली आहे.(Pimpri news) या सोसायट्यांमार्फत ओल्या कच-यावर सोसायटीच्या आवारातच प्रक्रीया करून तो जिरवला जात आहे. त्यामुळे भु-भरण संकलीत होणा-या कच-याच्या प्रमाणात घट होण्यास मदत होत आहे.

हौसिंग सोसायट्यांना मालमत्ताकरामध्ये 20 टक्के सवलत

मोठ्या प्रमाणात कचरा तयार होणा-या हौसिंग सोसायट्यांना साफसफाई करामध्ये सवलत दिल्यास कंपोस्टींग करणा-या सोसायट्यांच्या संख्येत वाढ होईल. अशा सोसायट्यांना मालमत्ताकरात सवलत घेता येईल.(Pimpri news) ही बाब लक्षात घेऊन अंदाजे 72 सदनिकाधारक संख्या असलेल्या सोसायट्यांमार्फत ऑनसाईट कंपोस्टींग यंत्रणा, मलनि:सारण यंत्रणा (एसटीपी प्लँट) तसेच झिरो वेस्ट संकल्पना राबविल्यास त्यांना बीलाच्या चालू मागणीतील साफसफाई करात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. आरोग्य विभागामार्फत सादर केलेल्या या प्रस्तावास महापालिका आयुक्तांनी 9 ऑक्टोबर 2021 रोजी मान्यता दिली.

त्यानुसार, ऑनसाईट कंपोस्टींग यंत्रणा कार्यान्वित असलेल्या म्हणजेच ओला कचरा पूर्णत: जिरविणा-या निवासी सोसायट्यांना साफसफाई करात 20 टक्के सवलत देण्यात येणार आहे.(Pimpri news) ओला कचरा पूर्णत: जिरविणा-या व एसटीपी कार्यान्वित असलेल्या निवासी सोसायट्यांना 30 टक्के तर झिरो वेस्ट संकल्पना म्हणजेच ओला व सुका कचरा पूर्णत: जिरविणा-या आणि एसटीपी कार्यान्वित असलेल्या निवासी सोसायट्यांना साफसफाई करात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या दैनंदीन कचरा संकलनामध्ये घट होऊन कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी होणा-या खर्चात कपात होणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.