Garbage issue : कचरा समस्येविरोधात मेदनकरवाडी ग्रामपंचायत आक्रमक

एमपीसी न्यूज : चाकण जवळील मेदनकरवाडी ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीत रस्त्यावर कचरा आणून टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाया करण्यास सुरुवात केली आहे.(Garbage issue) काही नागरिकांना दंडात्मक कारवाया करून समज देण्यात आली आहे. तर पंचायतीच्या कामगारांना दमबाजी करून कचरा टाकणाऱ्या नागरिकांना चक्क उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्याचे प्रकार सोशल माध्यमांत फिरणाऱ्या व्हिडीओ मधून समोर आले आहेत.

मेदनकरवाडी भागात चाकण एमआयडीसी मध्ये काम करणारे अनेक कामगार राहतात. त्यामुळे या वाडीची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे येथे कचरा समस्या जटील झाली आहे. मेदनकरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील बालाजीनगर भागात पुणे-नाशिक महामार्गाच्या लगत अनेक जण बिनधास्त कचरा टाकत आहेत. या बाबत ग्रामपंचायतीच्या कर्मचार्यांनी मज्जाव केल्यास त्यांच्याशी हुज्जत घातली जात आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांनी स्वतः अशा मंडळीना वठणीवर आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Supriya Sule : तुम्ही अजितदादांना मुख्यमंत्री करा ; सुप्रिया सुळेंनी एकनाथ शिंदेंना काय ऑफर दिली? 

अनेकांवर दंडात्मक कारवाया सुरु करण्यात आल्या आहेत. दांडगाई करणाऱ्या काही जणांना चक्क उठा- बशी काढण्यास लावल्याचे व्हिडीओ सोशल माध्यमात फिरत आहेत. मेदनकरवाडीचे सरपंच अमोल साळवे यांनी सागितले कि, या भागात मध्यरात्री काही जण रस्त्यावर कचरा टाकत आहेत.(Garbage issue) त्यांना मज्जाव करणाऱ्या पंचायतीच्या कर्मचार्यांना दमबाजी केली जात असल्याचे पदाधिकारी देखील या कारवाईत उतरले आहेत. अनेकांवर दंडात्मक कारवाई केली जात असून दांडगाई करणाऱ्या नागरिकांच्या बाबत पोलीस प्रशासनाला कळवले जात आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.