Supriya Sule : तुम्ही अजितदादांना मुख्यमंत्री करा ; सुप्रिया सुळेंनी एकनाथ शिंदेंना काय ऑफर दिली? 

एमपीसी न्यूज : वेदांता फॉक्सकॉनवरून सध्या राज्यात वादळ निर्माण झाल आहे. पुण्यातील तळेगाव जवळ होणारा हा प्रकल्प गुजरात राज्यात गेल्याने विरोधक सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत. या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून कालपासून सरकारवर टीका केली जात आहे.(Supriya Sule) राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल या विरोधात आंदोलन केले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान विरोधकांकडून टीका होत असल्याने एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाली असून वेदांता फॉक्स्वान सारखा किंवा त्यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला दिला जाईल असं आश्वासन नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांना दिल्याचं सांगितले जाते. यावर सुप्रिया सुळेंनी एकनाथ शिंदे यांना चक्क एक ऑफर दिली.

MPC News Podcast 15 September 2022 : ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

सुप्रिया सुळे म्हणाल्या तुम्ही अजित दादांना मुख्यमंत्री करा आम्ही तुम्हाला केंद्रात मोठं पद देऊ. असा खोचून तुला त्यांनी उदय संबंध यांच्या प्रतिक्रियावर विचारला असता दिला.(Supriya Sule) सुप्रिया सुळे म्हणाल्या हा राजकारणाचा विषय नाही. हा विषय गंभीर आहे. हा विषय महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि आर्थिक बाबीचा आहे. सर्व पक्षाच्या नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र यावं आणि महाराष्ट्रातून गेलेली ही गुंतवणूक परत आणावी असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.