Pimpri Chinchwad : स्वीकृत नगरसेवकपदी ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या पदाधिकारीच्या मागणीला अपना वैश्य समाज संघटनेचा पाठिंबा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत (Pimpri Chinchwad) एका स्वीकृत नगरसेवक पदावर ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिफारस केलेल्या ज्येष्ठ सदस्याची निवड करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे यांनी केली होती. त्यांच्या या मागणीला अपना वैश्य समाज या संघटनेने पाठिंबा दिला आहे.

याप्रकरणी अपना वैश्य समाज संघटनेचे अध्यक्ष अग्रसैनिक सुधीरकुमार अग्रवाल यांनी याबाबत एक प्रसिद्धीपत्रक काढले असून त्यात म्हटले आहे की, सचिन साठे यांनी केलेली मागणी योग्य असून या मागणीला आमचा पाठिंबा आहे. जर अशा पद्धतीने स्वीकृत नगर सदस्यांची निवड झाली, तर ती लोकतंत्राच्या चौकटीत बसत असेल ते नियमावलीला धरून असेल तर ते एक आदर्श पाऊन ठरेल. मनमानीचे राजकारण करणाऱ्यावर अंकुश बसेल. तसेच सर्वसामान्य जनतेतून उमेदवार मिळाल्याने एक विश्वास निर्माण होईल, असेही अग्रवाल यांनी म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील 147 ज्येष्ठ नागरिक संघाचा एक महासंघ आहे. या महासंघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत विजयी झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार पिंपळे निलख येथील जय मल्हार जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने रविवारी (दि.15) करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षपदावरून बोलताना सचिन साठे (Pimpri Chinchwad) यांनी सांगितले की, राज्य सरकारने नुकतेच महापालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक संख्या वाढविणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्यामध्ये विविध क्षेत्रातून निवृत्त झालेल्या अनुभवी जेष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये या ज्येष्ठ नागरिककांचा महासंघ देखील आहे.

PCMC : महापालिका निवडणुकीबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर; निवडणुकीचा तिढा कायम

या महासंघातील पदाधिकाऱ्यांचा अनुभव शहराच्या विकासासाठी आणि ज्येष्ठाच्या समस्यांबाबत महापालिकेमध्ये धोरण ठरवण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे अशा अनुभवी एका ज्येष्ठ नागरिकाची निवड स्वीकृत नगरसेवक पदी होणे हा शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड, पुणे महानगरपालिकेने त्याचबरोबर राज्यातील सर्व महानगरपालिकांनी स्वीकृत नगरसेवक पदी जेष्ठ नागरिकांची निवड करणे उचित ठरेल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.