PCMC : महापालिका निवडणुकीबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर; निवडणुकीचा तिढा कायम

एमपीसी न्यूज – राज्यातील महापालिका निवडणुकांचे (PCMC) भवितव्य निश्चित करणारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील आजची (बुधवार) सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. आता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीचा तिढा कायम आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राज्यातील निवडणुका रखडलेल्या आहेत. राज्यातील अनेक महापालिकांची मुदत संपल्यानंतर त्या ठिकाणी प्रशासक नेमण्यात आले आहेत. त्यांची सहा महिन्यांची मुदतही उलटून गेली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ 13 मार्च 2022 रोजी संपली आहे. तेव्हापासून महापालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. महापालिका निवडणुकांबाबतचे प्रकरण ब-याच दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी राजकीय आरक्षण, थेट नगराध्यक्ष पद्धत याबाबतचे प्रकरण प्रलंबित आहे.

Pune Crime News : पिण्याचे पाणी मागण्याच्या बहाण्याने दुकानदार महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील (PCMC) हे प्रकरण आज (बुधवारी) न्यायालयाच्या कामकाजामध्ये मेन्शन केले गेले होते. त्यानंतर सरन्यायाधीशांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी करण्यास सांगितले आहे. महापालिका निवडणुका नेमक्या कधी होणार याचे उत्तर या सुनावणीवर अवलंबून आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.