Pune Crime News : पिण्याचे पाणी मागण्याच्या बहाण्याने दुकानदार महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – पाणी पिण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने दुकानदार महिलेचे मंगळसूत्र जबरदस्तीने (Pune Crime News) हिसकावून नेले. ही घटना मंगळवारी (दि.17) दुपारी पावणे एक वाजता वडाची वाडी दारुंब्रे येथे घडली.

Alandi News: षटतीला एकादशी निमित्त माऊली मंदिरामध्ये भाविकांची गर्दी

याप्रकरणी 50 वर्षीय महिलेने शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या किराणा दुकानात असताना मंगळवारी दुपारी पावणे एक वाजता एक अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आला. त्याने दुकानासमोर दुचाकी पार्क केली आणि पाणी पिण्याच्या बहाण्याने फिर्यादीच्या दुकानात आला. पाणी पीत असताना त्याने अचानक फिर्यादीच्या गळ्यातील 45 हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. शिरगाव परंदवडी (Pune Crime News )पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.