Talegaon Dabhade : स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक (Talegaon Dabhade ) मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. आदर्श शिक्षक, विद्यार्थी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच ‘उडान’ या वार्षिक नियतकालिकाचे कार्यक्रमात प्रकाशन झाले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला या शाळेत चालना मिळत असल्याच्या भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.

श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल येथे बुधवार (दि.11) ते शुक्रवार (दि.13) या तिन्ही दिवशी ‘वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ’ उत्साहात संपन्न झाला.

समारंभास प्रमुख पाहुणे कलापिनी सांस्कृतिक कार्यकारी अध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे, प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे वश्रीकांत चौगुले, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वैशाली दाभाडे, रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष विल्सेन सालेर, नूतन विद्या प्रसारक मंडळाचे संचालक सोनबा गोपाळे गुरुजी, श्री.डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, शालेय समिती अध्यक्षा रजनीगंधा खांडगे, उपाध्यक्ष दादासाहेब उर्हे, सचिव मिलिंद शेलार, संचालक रामराव जगदाळे, खजिनदार सुदाम दाभाडे, शालेय समिती उपाध्यक्षा जयश्री जोशी, सल्लागार शबनम खान, कुसुम वाळुंज, शालेय मुख्याध्यापिका शमशाद शेख, पर्यवेक्षिका रेणू शर्मा, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख तेजस्विनी सरोदे, प्राथमिक विभाग प्रमुख धनश्री पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Alandi News: षटतीला एकादशी निमित्त माऊली मंदिरामध्ये भाविकांची गर्दी

स्नेहसंमेलनाची (Talegaon Dabhade) सुरुवात कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रंगमंचाच्या पूजनाने करण्यात आले. उपस्थित सर्वांनी ॲ. शलाका संतोष खांडगे,  दत्तात्रय (आप्पाजी) खांडगे, दिपक बीचे, श्रीकांत ओसवाल यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वागत नृत्य सादर करून उपस्थितांचे स्वागत केले.

‘उडान’ हे वार्षिक नियतकालिक श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलची अभिमानास्पद सांस्कृतिक परंपरा आहे. या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हे प्रकाशनाचे दहावे वर्ष आहे. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर गायन, नृत्य, नाट्य सादर केले. उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर करून दाद दिली.

शैक्षणिक वर्ष 2022 साठीचा आदर्श शिक्षक पुरस्कार संतोष खांडगे यांनी घोषित केला. विद्यालयातील पूर्व प्राथमिक विभाग शिक्षिका सविता विजय जाधव, प्राथमिक विभाग शिक्षका आयेशा आरिफ सय्यद, माध्यमिक विभाग विजयमाला गहिनीनाथ गायकवाड या शिक्षिका विजेता ठरल्या.

शलका संतोष खांडगे हिच्या स्मरणार्थ देण्यात (Talegaon Dabhade) आलेला पुरस्कार ॲ. शलाका संतोष खांडगे विद्यार्थी रत्न पुरस्कार : श्रेया रामकृष्ण टिळेकर (सिनियर केजी),  प्रगती अनिल लुगडे (इ. 4 थी, क), समिक्षा तारडे (इ.9 वी, अ) या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आला.

प्रतिवर्षी प्रत्येक वर्गातून दिला जाणारा बेस्ट स्टुडन्ट ॲवार्ड यावर्षी
देवांश संतोष गराडे (नर्सरी), आकाश लक्ष्मण पवार (ज्युनिअर केजी), श्रीशा सतीश यादव (सिनियर केजी)
इ. पहिली कापसे स्वरा गणेश (अ),  बामणे तनिष्का प्रदीप (ब), परमार कृष्णा विजय (क)
इ. दुसरी गुडमे आदिती अरुण (अ), सकते काव्या गणेश (ब),  मराठे शिवतेज शंकर (क)
इ. तिसरी उमरिया खनक उमेश (अ),  बवले धनश्री संतोष (ब),  बनकेले वेदिका संतोष (क)
इ. चौथी कदम अनुष्का महादेव (अ),  शेलार शौर्य संतोष (ब),  कावडे सिद्धार्थ हेमंत (क)
इ. पाचवी तनपुरे गणेश संदीप (अ),  राऊत मानसी आप्पा (ब),  जाधव पूर्वा बाळासाहेब (क)
इ. सहावी गराडे आर्यन संतोष (अ), शिंदे मल्हार सागर (ब)
इ. सातवी सोनटक्के ऋतुजा गणेश (अ) चव्हाण आयुषी नरेंद्र (ब), इ.आठवी कटरे सुरक्षा सर्जेराव इ. नववी, कवले ओम रवींद्र (अ), वर्मा आदर्श रामसिंग (ब) इ. दहावी जम्बुकर ओम दत्ता या विद्यार्थ्यांना देण्यात आला.

उत्कृष्ट वर्ग पुरस्कार 2022 चे विजेते वर्ग पूर्व प्राथमिक विभागातील सिनियर केजी, प्राथमिक विभागातील इ. चौथी (अ), माध्यमिक विभागातील इ. नववी (अ) यांना देण्यात आला. बेस्ट हाऊस ब्ल्यू हाऊस हा ठरला. वर्षभर क्रीडा क्षेत्राच्या अंतर्गत व शालाबाह्य स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यास दिला जाणारा चॅम्पियन ऑफ द इयर हा पुरस्कार अनन्या सचिन नवले (इ.9वी) या विद्यार्थिनीस, शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यास दिला जाणारा स्टुडन्ट ऑफ द इयर हा पुरस्कार भोकरे शरयू निरंजन (इ.10 वी) या विद्यार्थिनीस, विविध स्पर्धांमधून व शालांतर्गत उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवणाऱ्या विद्यार्थ्यास दिला जाणारा स्टुडन्ट ऑफ द गुड कण्डक्ट हा पुरस्कार दाऊतखणी नीतिशा मंगेश (इ.10 वी) या विद्यार्थिनीस देण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अंजली सहस्त्रबुद्धे यांनी आपले आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांचे व शिक्षकांच्या अध्यापनाचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांच्या मार्कांच्या मागे न धावता त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव द्यावा असे पालकांना मार्गदर्शन केले.

वक्ते श्रीकांत चौगुले यांनी स्वामी विवेकानंदांच्या जिजामाता व शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर ओघवत्या शैलीत सुश्राव्य कथन केले. मुलांना इंग्रजी शिक्षण घेता यावे या उद्देशाने मराठी प्रेमी संतोष खांडगे यांनी भारतीय तत्त्वज्ञान दाखवून देणारी शाळा स्वामी विवेकानंद या नावाने स्थापन केली. असा उल्लेख प्रमुख वक्ते श्रीकांत चौगुले असे कौतुकरुपी वक्तव्य केले. शिल्पा रोडगे यांनी स्वामी विवेकानंद व लोकमान्य टिळक यांच्या भेटीविषयी स्वामी विवेकानंदांच्या चरित्रा विषयी माहिती मुलांना अधिकाधिक द्यावी, असे पालकांना मार्गदर्शन केले.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी.चे अध्यक्ष रो.विल्सेन सालेर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना शिक्षकांबरोबरच, पालकांनी सुद्धा प्रोत्साहन द्यावे, असे वक्तव्य केले. राजकीय व सामाजिक कार्य करत असताना समाजातील मुलींवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडणाऱ्या इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी श्री.डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव केला.

विद्यार्थ्यांनी कृतीशील राहावे असा कानमंत्रही दिला. सर्व पाहुण्यांनी गुणवंत विद्यार्थी व शालेय मुख्याध्यापिका शेख, पर्यवेक्षिका शर्मा व सर्व शिक्षकांचे कौतुक केले.

श्री.डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि यापुढे शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी मार्गदर्शन केले.

शालेय समिती अध्यक्षा रजनीगंधा खांडगे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यालयातील विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. तसेच, संचालक जगदाळे यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या आभासी जगापेक्षा कलाक्षेत्राला निवडावे असे मार्गदर्शन केले.

सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता सुंदर, मनमोहक रांगोळ्या रेखाटणाऱ्या शालेय शिक्षिका आयेशा सय्यद, सविता जाधव, संध्या शिंदे, ऋतुजा सावंत, प्रेरणा बुरांडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख रूपाली कांबळे, विजयमाला गायकवाड; तसेच कोरिओग्राफर कुणाल मोरे, प्रसाद मंचरे, शालेय शिक्षिका करुणा वाघमारे, उत्कृष्ट वाद्य व रंगमंचाची सजावट करणारे एस.एस.के डेकोरेटर्स सुमित कार्ले या सर्वांचा कौतुकरुपी सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शालेय मुख्याध्यापिका शमशाद शेख, पर्यवेक्षिका रेणू शर्मा, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षिका तेजस्विनी सरोदे, धनश्री पाटील, आयेशा सय्यद यांनी तसेच इयत्ता नववी व दहावीतील ओम कवळे, समीक्षा तारडे,अमृता जाधव, शरयू भोकरे,खुशबू शर्मा या विद्यार्थ्यांनी केले. पर्यवेक्षिका रेणू शर्मा, शालेय शिक्षिका सविता जाधव, रूपाली कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.