Alandi News: षटतीला एकादशी निमित्त माऊली मंदिरामध्ये भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज – आज (दि.18 रोजी) तीर्थक्षेत्र आळंदी मध्ये षटतीला एकादशी निमित्त श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन मंदिरातील गाभाऱ्यात आकर्षक अशी फुलसजावट करण्यात आली होती.एकादशीच्या निमित्ताने हजारो भाविकांनी संजीवन समाधी (Alandi News) चे दर्शन घेतले.तसेच संजीवन समाधीच्या दर्शना साठी यावेळी दर्शन रांग भाविकांनी पूर्णपणे भरलेली दिसून आली.मंदिरात व इंद्रायणी घाटावरती भाविकांसाठी उपवासाच्या खाद्यपदार्थांचे प्रसाद म्हणून वाटप करण्यात येत होते.मंदिरातील सर्व सुव्यवस्था व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी पाहीली.पवित्र इंद्रायणी नदी मध्ये अनेक भाविकांनी स्नान केले.

Chinchwad News : चिंचवड येथे दागिने व रोख रक्कम असा 42 हजारांचा ऐवज चोरीला

मंदिर परिसराततील नो पार्किंग च्या जागेत अनेक दुचाकी वाहने लागल्याने भाविकांना ये जा करण्यासाठी अडचण निर्माण होत होती.मंदिर परिसरातील या वाहनांची समस्या आता नित्य स्वरूपाची झालेली दिसून येत आहे.येथील नो पार्किंगच्या जागेत दुचाकी वाहने लागू नये, याकरिता पालिका व वाहतूक प्रशासनास अद्याप ही तोडगा( Alandi News)सापडला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.