Pimpri news : पिंपरी – दापोडी दरम्यान असलेले रेल्वे फाटक तीन दिवसांकरीता बंद

एमपीसी न्यूज : पिंपरी – दापोडी दरम्यान (Pimpri news) असलेले रेल्वे फाटक तीन दिवसांकरीता बंद ठेवण्यात येणार आहे. आवश्यक दुरुस्तीच्या कामासाठी हे फाटक बंद ठेवण्यात येत आहे.

PCMC News : कार्यकारी अभियंता मनोज सेठिया यांना सह शहर अभियंतापदी बढती; उदय जरांडे विभागप्रमुख

पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावरील पिंपरी – दापोडी रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे किमी 178/600-700 येथील रेल्वे फाटक संख्या 60 आवश्यक दुरुस्ती कामांमुळे शुक्रवार दिनांक 14 ऑक्टोबर सकाळी 09.00 ते रविवार 16 ऑक्टोबर संध्याकाळी 05.00 वाजेपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.(Pimpri news) वरील कालावधीत जवळच असलेला रोड ओवर ब्रिज आणि भुयारी मार्ग वाहतुकीसाठी पर्याय म्हणून उपलब्ध असेल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.