Savitribai Phule University : टाईम्स रँकिंग मध्ये जागतिक पातळीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सहाशे ते आठशे च्या गटात..!!

एमपीसी न्यूज : द टाइम्स हायर एज्युकेशन 2023 ‘ क्रमावारीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दोनशे क्रमांकाने अलीकडचे स्थान मिळवत 601 ते 800 गटात स्थान मिळवले आहे.

‘द टाइम्स हायर एज्युकेशन’ या क्रमवारीत दरवर्षी जगातील अनेक विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांचे मुल्यांकन करून त्यांची क्रमवारी जाहीर करण्यात येते. 2023 या वर्षात जगातील 104 देशातील 2 हजार पेक्षा जास्त विद्यापीठांचे मुल्यांकन करत 1799 विद्यापीठांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. या मूल्यांकनात प्रामुख्याने अध्यापन, संशोधन, ज्ञानप्रसार, आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभाग आदी निकष तपासले जातात.

कोविड काळात आजाराची भीती, आंतरराष्ट्रीय वाहतूक आदी कारणांमुळे विद्यापीठातील परदेशी विद्यार्थी संख्येवर परिणाम झाला होता. मात्र आता कोविड नंतर परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर आली असून विद्यापीठाने आपले स्थान पुन्हा प्राप्त केले आहे.

आजवरचे वर्ष आणि रँकिंग
2020 – 601 – 800
2021 – 601 – 800
2022 – 801-1000
2023 – 601 – 800

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची क्रमवारी उंचवण्यात विद्यापीठातील संशोधक, प्राध्यापक, सर्व कर्मचारी यांचे परिश्रम आहेत, हे सामुदायिक योगदान आहे. भविष्यातील विद्यापीठाच्या वाटचालीचा आराखडा तयार केला असून सर्वांनी मिळून भविष्यातील उद्दीष्टे गाठण्यास प्रयत्न सुरू केले आहेत. भविष्यातही विद्यापीठ अशीच प्रगती करेल अशी मला खात्री आहे.
डॉ.कारभारी काळे, कुलगुरू
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

विद्यापीठाच्या कामाला मिळालेली ही पावती आहे असे मला वाटते. विद्यापीठात मोठ्या प्रमाणात संशोधनाचे काम करणारे प्राध्यापक, विद्यार्थी, यापुर्वीचे कुलगुरू आणि अधिकार मंडळे, प्रशासनातील सहकारी या सर्वांच्या मेहनतीचे हे फळ आहे. पुढील काळात अधिक प्रगती करण्यासाठी आपण सर्वच प्रयत्नशील आहोत.
डॉ.संजीव सोनवणे, प्र- कुलगुरू
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.