Chinchwad : दळवीनगर झोपडपट्टी मधील घराला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – चिंचवड मधील दळवीनगर झोपडपट्टीमध्ये भीषण आग लागली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना आज (गुरुवार) पहाटे साडेतीनच्या सुमारास लागली.

संजय क्षीरसागर (वय 35), प्रदीप मोटे (वय 32) अशी आगीत होरपळून मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे दळवीनगर झोपडपट्टीमधील एका घराला अचानक पहाटेच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच प्राधिकरण अग्निशमन विभागाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या आगीत झोपडपट्टीमधील काही घरे जाळून खाक झाली. तसेच घरामध्ये गाढ झोपलेल्या दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. गॅस लिकेज होऊन आग लागली असल्याचे सांगितले जात आहे. परंतु आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

https://www.youtube.com/watch?v=4eZSpdBJe3o&feature=youtu.be

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.