Pimpri : सौर ऊर्जेतून वीज निर्मितीचा संकल्प हाऊसिंग सोसायट्यांनी करावा; आयुक्त शेखर सिंह यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील हाऊसिंग सोसायट्यांनी सौर ऊर्जेतून वीज निर्मिती करून ती सोसायटीसाठी वापरावी. त्यातून मोठ्या प्रमाणात महावितरणच्या विजेची तसेच, सोसायटीच्या वीज बिलात बचत होते. तसेच, सोसायटीत निर्माण होणार्‍या ओला कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी पुढाकार घ्यावा. पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर (Pimpri)  करण्याची हातभार लावावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

पिंपरी येथील महिंद्रा रॉयल हाऊसिंग सोसायटीच्या वतीने 55 किलो व्हॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्या प्रकल्पाचे उद्घाटन आयुक्त  सिंह यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास महापालिकेचे सहायक आयुक्त अण्णा बोदडे, पोलिस निरीक्षक राजेंद्र निकाळजे, डॉ. मनीषा गरूड, महिंद्रा रॉयल हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष संजय पगारे, सचिव राजेश हेबर, खजिनदार वेणू गोपाल, संदीप मोरे, विना दवे, रेखा मुंडके, मनोज सिंग, सोहन मेनी, जगदीश पारी, संतोष मदनगरली, राहुल मराठे आणि सोसायटीचे सभासद आदी या वेळी उपस्थित होते.

Ajit Pawar : विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा द्यायला नको होता – अजित पवार 

सौर ऊर्जा पॅनेलमुळे मोठ्या प्रमाणात विजेची बचत होत असून, दरमहा दीड लाख रूपयांने बिल कमी येत आहे. सोसायटीला फाईव्ह स्टार रेटींग मिळाल्याने मिळकतकरात 7 टक्के सवलत मिळाली आहे. तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत ओल्या कचर्‍याची विल्हेवाट लावून शून्य कचरा मोहिम राबविल्याबद्दल ‘क’ क्षेत्रीय कार्यालयात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक व प्रमाणपत्र मिळाले आहे.

दरम्यान, यानिमित्त सोसायटीच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. त्यात 55 जणांचे हद्यरोग तपासणी करण्यात आली. तर, 45 जणांनी रक्तदान केले. पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालयाच्या सहकार्याने शिबिर घेण्यात (Pimpri)  आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.