Ajit Pawar : विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा द्यायला नको होता – अजित पवार 

अजित पवारांनी नाना पटोलेना लगावला टोला 

एमपीसी न्यूज-  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च (Ajit Pawar) न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होते.त्यावर काल सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असून प्रदोत नियुक्तीवरून शिंदे गटाला जोरदार झटका दिला आहे.भरत गोगावलेंची प्रतोदपदी केलेली नियुक्ती अवैध असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे.तसेच तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवर देखील न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.या सर्व घडामोडी बाबत आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, प्रतोद नेमण्यापासून अनेक गोष्टींना सर्वोच्च न्यायालयाने चुकीचं म्हटलं असून त्याच पुढे काय झालं ? यामध्ये एक तर आमचे त्यावेळचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिला.
तो राजीनामा त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न विचारता देण्यात आला.राजीनामा दिल्यावर(Ajit Pawar) माहिती देण्यात आली.एक तर तो राजीनामा द्यायला नको होता.अशा शब्दात अजित पवार यांनी नाना पटोले यांना टोला लगावला.तर राजीनामा दिल्यानंतर लगेच पुन्हा विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊन तो विषय संपवायला हवा होता.आमच्या सगळ्यांकडून त्यावेळी दुर्दैवाने झालं नसल्याचे कबुली देखील अजित पवार यांनी यावेळी दिली.

 

PCMC : शिपायाने सात वर्षे मारली दांडी, पालिकेने केले बडतर्फ

तसेच ते पुढे म्हणाले की,मी यासाठी एकट्याला दोषी धरत नाही. आमच्या महाविकासआघाडीकडून तो विषय तातडीने धसास लागला असता तर त्या ठिकाणी आमचे विधानसभा अध्यक्ष बसले असते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली या सर्व गोष्टी झाल्या असत्या.तसेच जून महिन्याच्या राजकीय घडामोडीनंतर शिंदे फडणवीसांनी पहिल्यांदा बहुमताच्या जोरावर अध्यक्षपदाची रिक्त जागा प्रथम भरली.जर त्या जागेवर मविआचे नेते असते तर त्यांनी या 16 आमदारांना तेव्हाच अपात्र ठरवलं असते अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

 

माझा आणि जयंत पाटील यांचा संपर्क झाला नाही : अजित पवार 

 राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस (Ajit Pawar)बजावण्यात आली आहे.सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले.याबाबत अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की,माझ्याशी अनेक संबंधीत वेगवेगळ्या लोकांना ईडीमार्फत नोटीस आली होती.
हे आपण पाहिलं असून सीबीआय, ईडी, एनआयए, आयटी, एसीबी, सीआयडी, पोलीस या वेगवेगळ्या तपास संस्थांना चौकशी करण्याचा अधिकार आहे. त्याचा वापर करून काही लोकांना अशा नोटीस येतात. त्या नोटीसला उत्तर देणं हे नोटीस आलेल्या लोकांचं काम आहे.तसेच माझा आणि जयंत पाटील यांचा संपर्क झाला नाही.

Ajit Pawar : पवारांसमोर रडण्यापेक्षा ठाकरेंसमोर रडल्या असत्या तर योग्य झाले असते ; अजित पवारांचे सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर

आम्ही फलटणला अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमाला एकत्र होतो. त्यावेळी आम्ही एकत्र जेवण देखील केले.तोपर्यंत त्यांना ईडीची नोटीस आलेली नव्हती आणि मला नोटीसबाबत अद्याप तरी काही माहिती नाही.त्याबाबत मी जयंत पाटलांकडून माहिती घेऊन त्यावर माझी भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी  (Ajit Pawar) सांगितले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.