Ajit Pawar : पवारांसमोर रडण्यापेक्षा ठाकरेंसमोर रडल्या असत्या तर योग्य झाले असते ; अजित पवारांचे सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर

एमपीसी न्यूज- सुषमा अंधारे यांनी शरद पवार (Ajit Pawar) यांच्यासमोर रडण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्यासमोर रडल्या असत्या तर जास्त योग्य ठरले असते. त्यांच्या पक्षाचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना हा मुद्दा उपस्थित करायला लावला असता तर आणखी योग्य ठरले असते असे म्हणत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर दिले. दोन दिवसांपूर्वी सातारा येथे झालेल्या एका कार्यक्रमात सुषमा अंधारे यांनी विरोधी पक्ष नेत्यांनी सभागृहात आवाज उठवला नाही असे म्हणत शरद पवार यांच्या समोरच अश्रू ढळले होते.

अजित पवार म्हणाले, शिवसेनेचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आहेत. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी शरद पवारांसमोर भावनिक होण्यापेक्षा त्या ज्या पक्षाचे काम पाहतात, ज्या पक्षासाठी त्या सभा घेतात, त्यांनी अजित पवारांचे नाव घेण्यापेक्षा त्यांच्या पक्षाच्या विरोधी पक्ष नेत्याला सांगायला पाहिजे. जेवढा अधिकार विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्याला आहे तेवढाच अधिकार विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्याला ही आहे. त्यामुळे शरद पवारांसमोर रडण्यापेक्षा त्या जर उद्धव ठाकरे यांच्यासमोर रडल्या असत्या तर योग्य झाले असते.

IPL 2023-राजस्थानचा केकेआरवर रॉयल विजय

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे साताऱ्यात एका कार्यक्रमात भाषण देताना ढसाढसा रडल्या होत्या. या कार्यक्रमात सुषमा अंधारे वंचित भटक्या आणि सोशीतांवर भाषण देत असताना त्यांना आपले अश्रू अनावर झाले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार होते. यावेळी भाषण करताना सुषमा अंधारे म्हणाल्या माझ्यावर अश्लाघ्य भाषेत आमदार टिपणी करतात मात्र यानंतरही एकाही पोलीस ठाण्यात तक्रार लिहून घेतली जात नाही. सभागृहात तेव्हा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावर केलेल्या अश्लाघ्य टिप्पणी बदल साधी तक्रारही केली नाही असा सवाल त्यांनी विचारला होता. त्यांचा रोख हा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या (Ajit Pawar) दिशेने होता.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.