Maharashtra : शिंदे – फडणवीस नैतिकतेच्या आधारावर स्वप्नातही राजीनामा देणार नाहीत – अजित पवार

एमपीसी न्यूज- महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने ( Maharashtra) गुरुवारी निकाल दिला. हा निकाल देताना न्यायालयाने अनेक निरीक्षणे नोंदवली. महत्त्वाच्या टीका टिप्पण्याही केल्या. इतकच नाही तर तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यावर देखील ताशेरे ओढले. मात्र तरीही या निकालानंतर राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यानंतर आता विरोधी पक्ष नेत्यांकडून नैतिकतेच्या आधारावर शिंदे फडणवीस सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे. त्यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आपले रोखठोक मत व्यक्त केले.
अजित पवार आज सकाळी पुण्यात बोलत असताना म्हणाले, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे नैतिकतेच्या जोरावर राजीनामा देणार नाहीत. प्रत्यक्षात तर ते राजीनामा देणार नाहीत कुणी स्वप्नातही असा विचार करू नये असे म्हणत त्यांनी या दोघांनाही टोला लागावला.

अजित पवार म्हणाले अटल बिहारी वाजपेयी आणि आताच्या काळातील नेत्यांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. यापूर्वीच्या राजकारणाची बात काही और होते. त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर कोणीही पायउतार होणार नाही. स्वप्नातही असा विचार करू नका असे म्हणत त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला ( Maharashtra) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.