IPL 2023-राजस्थानचा केकेआरवर रॉयल विजय

स्फोटक खेळी करणारा यशस्वी ठरला सामनावीर

एमपीसीन्यूज:(विवेक कुलकर्णी)यशस्वीच्या झंझावातात केकेआरची झाली वाताहत

दणदणीत विजयासह राजस्थानची रॉयल घोडदौड सुरूच.
युवा आणि प्रतिभावंत फलंदाज यशस्वी जैस्वालच्या तडाखेबंद फलंदाजीमुळे आणि त्याला मिळालेल्या कर्णधार संजूच्या तशाच साथीदारीमुळे राजस्थानने कोलकाता नाईट रायडर्सवर 9 गडी आणि 41 चेंडू राखत दणदणीत विजय मिळवून आपली वाटचाल शानदाररित्या चालूच (IPL 2023)ठेवली आहे.

आयपीएल 2023 च्या कालच्या 56 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि केकेआरला त्यांच्याच घरात केवळ 149 धावात रोखून अर्धी बाजी मारली, या छोट्या लक्षाचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वालने अतिशय स्फोटक फलंदाजी केली,त्याला तितकीच महत्वपूर्ण साथ कर्णधाराचीही मिळाल्याने राजस्थानसंघाने केकेआरवर रॉयल विजय(IPL 2023) मिळवला

.Kharadi : खराडीतील प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये तरुणाला बाऊन्सरकडून मारहाण; तरुणीला धक्काबुक्की

प्रथम फलंदाजी करताना केकेआरची सुरुवात अतिशय खराब झाली, आक्रमक फलंदाज म्हणून ओळख असलेल्या जेसनरॉयला आज आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करता आली नाही अन तो केवळ 10 धावा करुन बोल्टची शिकार झाला,बोल्टनेच दुसरा सलामीवीर गुरबाजलाही 18 या वैयक्तिक धावसंख्येवर बाद करून केकेआरला दुसरा धक्का दिला,यानंतर मात्र वेंकटेश अय्यर आणि कर्णधार नितीश राणा यांनी प्रगल्भता दाखवून संघाचा डाव बऱ्यापैकी सावरला.ही जोडी बऱ्यापैकी स्थिर झाली असे वाटत असतानाच कर्णधार राणा वैयक्तिक 22 धावा करुन बाद झाला अन केकेआरचा डाव पुन्हा एकदा गडगडला. राणा 11 व्या षटकात बाद झाला तेंव्हा केकेआरच्या नावावर 3 बाद 77 अशी धावसंख्या दिसत होती, मात्र त्यानंतर वेंकटेश अय्यरला फारशी साथ न मिळाल्याने केकेआरचा डाव 149 धावातच संपुष्टात आला.अय्यरने एकाकी झुंज देत आपले अर्धशतक पूर्ण करत संघाला संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली ,पण ती अखेर वांझोटीच ठरली.राजस्थान संघाकडून यजुर्वेद्र चहलने अप्रतिम गोलंदाजी करत केकेआर संघाचा डाव स्थिरावूच दिला नाही ,त्याने चार बळी मिळवले तर त्याला ट्रेंट बोल्टने उत्तम साथ देत 2 बळी मिळवले. केकेआर कडून एकट्या वेंकटेश अय्यरने 52 धावा(IPL 2023 )काढल्या.

या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वालने अतिशय खतरनाक अंदाजात फलंदाजी सुरू केली, त्याने डावाच्या पहिल्याच षटकात 26 धावा चोपून नवीन विक्रम केला,त्याचा हा झंझावात असाच कायम राहिला अन त्याने केवळ 15 चेंडूतच अर्धशतक पूर्ण करत आयपीएल मध्ये राजस्थान साठी विक्रमी अर्धशतक पूर्ण केले,अर्धशतकानंतरही त्याचा धडाका असाच कायम राहिला, ज्यात केकेआरच्या गोलंदाजांची पुरती वाताहात झाली,समाधानाची बाब इतकीच की त्यांना किमान एक बळी तरी मिळवता आला,पण त्यानंतर आलेल्या संजू सॅमसननेही वाहत्या गंगेत हात धुवून घेतल्याने केकेआरचे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकही पुरते हतबल झाले, यशस्वीचे शतक पूर्ण होईल की इतकीच उत्सुकता बाकी होती, त्यासाठी कर्णधार संजूने स्वतःचे अर्धशतक पूर्ण न करता त्याला जास्तीत जास्त स्राईक देण्यासाठी त्याग केला,पण यशस्वीला षटकार न मारता आल्याने तो 98 धावांवर नाबाद राहिला,ज्या फक्त 47 चेंडूत आल्या,ज्यामध्ये 12 चौकार आणि 5 षटकार सामील होते तर संजूनेही केवळ 29 चेंडूत 5 षटकार आणि दोन चौकार मारत नाबाद 48 धावा केल्या,या तुफानी फलंदाजीमुळे राजस्थान संघाने 9 गडी आणि 41 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवून आपल्या प्ले ऑफ मध्ये पोहचण्याच्या आशा आणखीनच बळकट केल्या आहेत तर केकेआरला आता या साठी खूपच संघर्ष करावा लागणार आहे.विक्रमी अर्धशतक करणारा यशस्वी सामन्याचा (IPL 2023)मानकरी ठरला.

संक्षिप्त धावफलक
केकेआर 8 बाद 149
अय्यर 52,राणा 22,गुरबाज18,रिंकू 16
चहल 25/4,बोल्ट 15/2
पराभूत विरुद्ध
राजस्थान रॉयल्स
13.1षटकात 1 बाद 150
यशस्वी नाबाद 98,संजू सॅमसन नाबाद 48

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.