Kharadi : खराडीतील प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये तरुणाला बाऊन्सरकडून मारहाण; तरुणीला धक्काबुक्की

एमपीसी न्यूज- चंदन नगर पोलीस (Kharadi)स्टेशनच्या हद्दीतील प्रसिद्ध 7 ए रेस्टॉरंट अँड बार या ठिकाणी मैत्रिणीसह जेवण करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला आणि त्याच्या मैत्रिणीला मारहाण करत धक्काबुक्की करण्यात आली. 9 मे च्या रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी तीन बाऊन्सर विरोधात चंदन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संकेत गायकवाड सनी विष्णू पवार आणि आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र हुक्काराम चौधरी (वय 31, स्काय लाईन सोसायटी प्रगती नगर रावेत) या तरुणाने याप्रकरणी तक्रार दिली आहे.

Hadapsar : मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ केल्याने मुलाकडून वडिलांचा खून; हडपसर परिसरातील घटना

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी त्याच्या दोन मैत्रिणी सोबत या हॉटेलमध्ये जेवण आणि ड्रिंक करण्यासाठी गेले होते. फिर्यादी काउंटरवर गेले असता त्याच्या हातातील सिगारेट पाहून हॉटेलमधील बाउन्सर सनी पवार यांनी येथे सिगारेट ओढू नको असे सांगितले. त्यावर फिर्यादीने सिगारेट पेटवली नाही फक्त बोटात धरली आहे असे सांगितले. यावरून वाद झाला आणि बाऊन्सरनी फिर्यादी यांच्या कानाखाली मारत शिवीगाळ केली. इतकेच नाही तर चमचा घेऊन छातीजवळ मारून जखमी केले.

फिर्यादीची मैत्रीण भांडणे सोडवण्यासाठी आली असता आरोपीने तिलाही धक्काबुक्की केली आणि इतर आरोपींनी फिर्यादी यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. चंदन नगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक (Kharadi) तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.