Nigdi Crime : तरुणाला दगडाने व चॉपरने मारहाण, दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज –  काही करण नसताना तरुणाला दोघांनी दगडाने व चॉपरने मारहाण करत जखमी केले. ही घटना चिंचवडच्या अजंठानगर (Nigdi Crime) येथे बुधवारी (दि.10) सायंकाळी घडली. 

याप्रकरणी कुणाल चंद्रसेन गायकवाड (वय 22 रा.चिंचवड) यांनी गुरुवारी (दि.11) फिर्याद दिली असून रामा नंदू कुऱ्हाडे व सुमित सुंदर राऊत ( दोघे रा. चिंचवड) यांच्यावर निगडी (Nigdi Crime) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : सौर ऊर्जेतून वीज निर्मितीचा संकल्प हाऊसिंग सोसायट्यांनी करावा; आयुक्त शेखर सिंह यांचे आवाहन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या दुचाकीवर बसले असताना आरोपी तेथे आले व त्यांनी काहीही कारण नसताना संगनमत करत फिर्यादीला डोक्यात पाठीमागे दगडाने मारून व पुढे लोखंडी चॉपरने खांद्यावर मारून जखमी केले. निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.