Pimpri : पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या (Pimpri) वतीने महानगरपालिकेतील पत्रकार कक्षात मराठी पत्रकारीतेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून “पत्रकार दिन” अर्थात “दर्पण दिन” साजरा करण्यात आला.

या वेळी मराठी पत्रकार परिषदेचे पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी, पोस्ट विभागाचे नितिन बने,पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, कार्याध्यक्ष अविनाश अदक, उपाध्यक्ष सुरज साळवे, सचिव विनायक गायकवाड, दत्तात्रय कांबळे, संतोष गोतावळे, महावीर जाधव, रामकुमार शेडगे, ओम गवळी, विनय सोनवणे, संदिप सोनार, राकेश पगारे, सुनील भिसे, महिला पत्रकार श्रद्धा प्रभुणे आदींसह सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थितीत होते.

या वेळी अध्यक्ष वडघुले म्हणाले की, 6 जानेवारी हा मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पणपासून सुरू झालेली मराठी पत्रकारिता आता डिजिटल झाली आहे. लाखो तरुण तरुणी ब्लॉगिंग, वेबसाइट्स आणि युट्युब चॅनेलहून व्यक्त होत आहेत आणि आपल्या भागाचे, समुदायाचे प्रतिनिधित्व करताना दिसत आहेत. पत्रकारांनी आरोग्य सांभाळून काम केले पाहिजे. असे बोलून त्यांनी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Chinchwad : आशयप्रधान आणि वास्तवावर भाष्य करणारी नाटकं व्हायला हवीत – शरद पवार

पोस्ट विभागाचे नितीन बने, यांनी कालिदासाचे पाण्यात जांभूळ पडून मासे का खात नाही हे उदाहरण देऊन पत्रकारांनी स्वतः ची काळजी घेण्याचे आवाहन करत पोस्ट विभागाच्या योजनांचे महत्त्व पटवून दिले.पोस्ट विभाग च्या अनेक (Pimpri) योजनाची माहिती यावेळी त्यांनी दिली. पत्रकारांना पोस्टा मध्ये अडचणी आल्यास सहकार्य केल्या जाईल.

या वेळी सभासद यांच्या आरोग्याच्या काळजीसाठी आयुष्यमान भारत कार्ड व पोस्ट विभागाच्या विमा कार्ड यासाठी नोंदणी करण्यात आली.

मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव गणेश मोकाशी, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष अविनाश अदक,उपाध्यक्ष सुरज साळवे यांनीही यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज साळवे यांनी तर आभार उपाध्यक्ष दत्ता कांबळे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.