Pimpri: कलापिनीचे ‘शतपावली’ मूकनाट्य ओडिसामध्येही प्रथम

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे मधील कलापिनी संस्थेचे ‘शतपावली’ या मुकनाट्याने अटकेपार झेंडा रोवला आहे. ओडिसा येथील कटकच्या जागतिक रंगभूमी महोत्सवात या मूकनाट्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

जागतिक रंगभूमी महोत्सव २० ते ३१ जानेवारी २०२० या कालावधीत ओडिशा मधील कटक येथे पार पडला. या महोत्सवात तळेगाव दाभाडे मधील कलापिनी संस्थेने शतपावली हे नाटक २२ जानेवारी रोजी सादर केले. ३५ मिनिटांचे हे नाटक मूकनाट्य आहे. महोत्सवात या नाटकाला सर्वोत्कृष्ट मूकनाट्य म्हणून प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.

कलापिनीच्या वतीने हे नाटक पुण्यातील मौनांतर स्पर्धेत सादर करण्यात आले. त्यातही या नाटकाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तसेच सर्वोत्कृष्ट लेखन, सर्वोत्कृष्ट अभिनय अशीही पारितोषिके मिळाली आहेत. शतपावली नाटकाचे लेखक गंधार जोशी आणि दिग्दर्शक चेतन पंडित आहेत.
पुण्यात झालेल्या नाट्यसत्ताक २०२० या महोत्सवातही शतपावली नाटक सादर करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.