Nigdi : कार विकण्याच्या बहाण्याने तोतया आर्मी ऑफिसरने तरुणीला घातला 65 हजारांचा गंडा

एमपीसी न्यूज – ओएलएक्सवर कारची जाहिरात देऊन आपण आर्मी ऑफिसर असल्याचे भासवून कार घेण्यासाठी संपर्क केलेल्या तरुणींकडून 65 हजार 200 रुपये घेतले. पैसे घेऊन कार न देता तिची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तोतया आर्मी ऑफिसरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 5) रात्री सव्वानऊच्या सुमारास घडला.

हर्षिता सर्जेराव मधाळे (वय 19, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 8133077241 या मोबाईल क्रमांक धारक आणि 918486003931, 918723822149 या गुगळे पे अकाउंट धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याची कार विकण्याची जाहिरात ओएलएक्स या ऑनलाईन संकेतस्थळावर दिली. ती जाहिरात पाहून फिर्यादी यांनी जाहिरातीत दिलेल्या 8133077241 या क्रमांकावर संपर्क केला. आरोपीने आपले नाव हर्षित सिंग असून आपण आर्मी ऑफिसर असल्याचे सांगितले. त्याची एम एच 12 / एम आर 8025 ही वेगनआर कार विकायची असल्याचे सांगितले.

फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून गुगळे पेच्या दोन अकाउंटवर 65 हजार 200 रुपये ट्रान्स्फर करण्यास सांगितले. फिर्यादी यांनी पैसे ऑनलाईन दिले. मात्र, पैसे देऊन फिर्यादी तरुणीला आरोपीने चार दिली नाही. याबाबत आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.