Nigdi : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणासह तिघांना मारहाण

एमपीसी न्यूज – भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणासह ( Nigdi) तिघांना बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि. 14) सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास म्हाळसाकांत कॉलेज जवळ, प्राधिकरण निगडी येथे घडली.
सनी गणेश शिंदे (वय 19, रा. साने चौक, चिखली), वरद सुनील सोनवणे, आशिष अण्णासाहेब सुर्वे अशी मारहाण झालेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी सनी शिंदे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार आर्यन यादव, मनीष उबाळे, रोहित मुठे, हितेश रोकडे (सर्व रा. मोरेवस्ती, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शनिवारी सकाळी चहा पिण्यासाठी गणेश तलाव, प्राधिकरण येथे जात होते. त्यावेळी म्हाळसाकांत कॉलेज जवळ आरोपी हे फिर्यादी यांचे मित्र वरद आणि आशिष यांना मारहाण करत होते.
हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी गेले असता आरोपींनी फिर्यादी यांना देखील बेदम मारहाण केली. यात फिर्यादी यांचे नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. निगडी पोलीस तपास करीत ( Nigdi) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.