Pimpri : विवाहित महिलेला सोशल मिडियाची ओळख पडली भारी; लग्नाचे आमिष नंतर बलात्कार

एमपीसी न्यूज : इंस्टाग्रामच्या माध्यमातून विवाहित महिलेवर (Pimpri) लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याची घटना पिंपरी चिंचवड येथे घडली. विविध कारणे सांगून 5 लाख रुपये आणि सोने घेऊनही तिचे अश्लील फोटो तिच्या नातेवाईकांना पाठवण्याची धमकी दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. 32 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे 2021 ते मार्च 2023 दरम्यान हा प्रकार घडला. ही महिला सोशल मिडियाच्या माध्यमातून मे 2021 मध्ये आरोपीच्या संपर्कात आली.

Talawade : स्पाईन रोडला अडथळा ठरणा-या घरांवर कारवाई

त्याने महिलेला जळगावचा रहिवाशी असल्याचे सांगितले. या दोघांचा एकमेकांसोबत दररोज संपर्क होऊ लागला. ते दोघे प्रत्यक्ष भेटलेही. आरोपीने तक्रारदाराशी लग्न करण्याचे आश्वासन दिले. आणि या आमिषाने तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले.

तसेच, वेगवेगळ्या बहाण्याने एकूण 5.25 लाख रुपये आणि 50 ग्रॅम सोन्याचे दागिने घेतले. लग्नाचे खोटे आश्वासन देऊन त्याने तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला आणि तिचे विवस्त्र फोटोही (Pimpri) क्लिक केले. नंतर ते फोटो तिच्या पती आणि कुटुंबीयांना पाठवण्याची धमकी दिल्यानंतर महिलेने पोलिसांत धाव घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.