Pune : दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे आरोग्य शिबीर; शिबीरात 857 जणांची मोफत तपासणी

एमपीसी न्यूज : रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगिकारुन कार्यरत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे (Pune) जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने कोतवाल चावडी, बुधवार पेठ येथे हे शिबीर घेण्यात आले. शिबारीत 857 जणांची मोफत तपासणी करण्यात आली.

शिबीराचे उद््घाटन अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पुणे मनपा आरोग्यप्रमुख डॉ.भगवान पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी येरवडा कारागृहाचे मानसोपचार तज्ञ डॉ.संदीप महामुनी, ससून रुग्णालयाचे डॉ.गिरीश बारटक्के, प्रादेशिक मनोरुग्णालय येरवडाचे डॉ. शिवाजी शिंदे, डॉ.महादेव गिरी, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, विश्वस्त अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, राजाभाऊ घोडके, राजाभाऊ चव्हाण, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, इंद्रजीत रायकर आदी उपस्थित होते. ट्रस्टचे आरोग्य समन्वयक राजेंद्र परदेशी व पराग बंगाळे यांनी शिबीरांच्या नियोजनात सक्रिय सहभाग घेतला.

Pimpri : विवाहित महिलेला सोशल मिडियाची ओळख पडली भारी; लग्नाचे आमिष नंतर बलात्कार

ट्रस्ट आरोग्यसेवेच्या कार्यात सातत्याने कार्यरत असून हे शिबीर त्याचाच एक भाग आहे. वर्षभरात ससून रुग्णालयातील रुग्णांची भोजनसेवा तसेच पुण्यासह महाराष्ट्रात 11 रुग्णवाहिन्यांच्या माध्यमातून पुण्यात विनामूल्य व महाराष्ट्रात डिझेल खर्चात सेवा दिली जाते. आरोग्य शिबीरात डोळ्यांची तपासणी, चष्मा वाटप, विविध रक्त तपासण्या, फिजिओथेरपी, कर्करोग उपचाराविषयी सल्ला, हाडांची घनता तपास्णी, ह्रदयाचा ईसीजी आदी तपासण्या करण्यात आल्या. शिबीराच्या माध्यमातून अनेक रुग्णांची माफक दरामध्ये एंजियोग्राफी देखील करण्यात आली.

डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालय पिंपरी, एम्स हॉस्पिटल औंध, क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर, सूर्या सह्याद्री हॉस्पिटल, लायन्स क्लब आॅफ पुणे, देसाई हॉस्पिटल महंमदवाडी, माय माऊली केअर सेंटर, डॉ.अमित सरोदे-फिजिओथेरपी क्लिनिक, ओ.एन.पी.हॉस्पिटल शिवाजीनगर, हेल्थ होरिझॉन (Pune) डायग्नोस्टिक्स, डॉ.चित्रा सांबरे – बालाजी आय क्लिनिक यांनी शिबीरात सहभाग घेत सेवा दिली. आज 25 जणांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.

रुग्णांना मोतिबिंदू, किडनी स्टोन, प्रोस्टेड ग्रंथी, एन्जोप्लास्टी, ह्रदय बायपास, लहान मुलांच्या ह्रदयाला छिद्र असणे, व्हॉल रिप्लेसमेंटे, पेसमेकर, डिवाईस क्लोजर, मणक्याची शस्त्रक्रिया, मेंदूची शस्त्रक्रिया, कॅन्सरची शस्त्रक्रिया इत्यादी शस्त्रक्रिया मोफत स्वरुपात करुन देण्यात येणार आहेत.(Pune) दर महिन्यातून एकदा असे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येणार असून गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.